Narayan Rane Jan Ashirwad Yatra : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत आज जनआशिर्वाद यात्रा निघाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यापूर्वी नारायण राणे यांची जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीकेचा बाण सोडला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे यांनी भाजपचे आभार मानले. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी आपल्या भाषाणाची सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे सरकारवर टीकाचा बाण सोडला.
महाराष्ट्रातील जनता आताच्या सरकारला कंटाळलेली आहे. हे सरकार राज्यातील कुठल्याही समस्येचा विचार करु शकत नाही. उद्धव ठाकरे आपल्या नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करत आहेत. जनता राज्यातील सरकारला कंटाळली आहे. त्यामुळेच आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे, असा टीकेचा बाण नारायण राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेत सोडला.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आजपासून राणेंची जनआशीर्वाद यात्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला राणे भेट देणार आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा इशारा दिल्याने दादर येथे वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्याने शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने सुरक्षेची व्यवस्था केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.