पाण्यासाठी राष्ट्रवादीचा कळवा प्रभाग समितीवर 'जनआक्रोश'मोर्चा

पाण्यासाठी राष्ट्रवादीचा कळवा प्रभाग समितीवर 'जनआक्रोश'मोर्चा
Updated on

कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग समिती असा राष्ट्रवादीने 'जनआक्रोश' मोर्चा काढला. त्यात कळवा परिसरातील हजारो नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे कळवा प्रभाग समिती समोर जाहीर सभेचे रूपांतर झाले. 

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेची महापालिकेवर गेल्या 25 वर्षां पासून सत्ता असताना महापालिकेला स्वतःचे धारण बांधता येत नाही. कळवा परिसरात व डोंगर भागावर पाणी चोरणारे दलाल निर्माण झाले असून पाणी खाते चोर असून पाणी विकण्याचे काम शिवसेनेचे शाखा प्रमुख करतात. व महापालिकेतील पाणी, कचरा चोरी हा शिवसेनेचा धर्म असल्याची टीका त्यांनी केली. निवडणूका आधी ठाणेकरासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे निवडणूक जाहीर नाम्यात शिवसेनेने सांगितले होते ते आश्वासन त्यांनी पाळले नाही याचे उत्तर पालक पालकमंत्री व  उद्धव ठाकरे यांनी द्यावे असे त्यानी शिवसेनेलाआव्हान दिले. पाणी मिळणार नसेल तर त्याचा बिल न भरण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. पाण्याच्या प्रश्नांसाठी वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन कारागृहात जाण्याची तयारी असून येत्या आठ दिवसांत कळवा परिसरातील पाणी प्रश्न न सुटल्यास ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.या वेळी राष्ट्रवादीच्या महिलांनी डोक्यावरील रिकामी मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. 

यावेळी रिकामी मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, नगरसेवक मुकुंद केणी, प्रमिला केणी, महेश साळवी, वर्षा मोरे, अपर्णा साळवी, आरती गायकवाड, आदी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा नंतर कळवा प्रभाग समितीतील पाणी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात कळवा परीसरात पाण्यासाठी नवी जळ वाहिनी टाकून पानी समस्या सोडविण्याचा व अनधिकृत पणे पाणी चोरांवर पोलीसांत गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिले.

मोर्च्यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय
काळवा प्रभाग समितीवर मोर्चा असल्याने प्रभाग समितीत पाणी बिल, मालमत्ता कर, भरण्यासाठी आलेल्या काही जेष्ठ नागरिकांना प्रवेशद्वारवर सुरक्षारक्षकांनी अडवल्याने त्यांना बराच उशीर फुटपाथवर ताटकळत बसावे लागल्याची तक्रार मनिला परमार यांनी केली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
या मोर्च्यासाठी पोलिसांनी सकाळ पासूनच ठिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्या मुळे हा मोर्चा शिस्तबद्ध रीतीने पार पडला."कळवा परिसरात सध्या नागरिकांना आंघोळी साठी व शारीरिक स्वच्छतेसाठी नागरिकांना नियमितपणे पाणी मिळत नाही. निवडणूकी आधी शिवसेनेने पाण्यासाठी धरण बांधण्याची घोषणा केली होती.व निवडणूक जिंकली होती. 25 वर्ष सत्ता असून ही ठाण्यातील नागरिक त्रस्त आहेत म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागत आहे म्हनून स्वतंत्र धरण बांधावे ही आमची मागणी आहे"
- आमदार, जितेंद्र आव्हाड,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.