Jayant Patil ED Inquiry : जयंत पाटलांची आज ईडी कार्यालयात चौकशी; राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

NCP Jayant Patil
NCP Jayant Patilesakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यां आज, २२ मे रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली असून या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांची सकाळी अकरा वाजता चौकशी केली जाणार आहे. IL&FS प्रकरणी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी प्रदेश कार्यालया बाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत आहेत.

NCP Jayant Patil
Lok Sabha Election : दोन हजारांच्या नोटांचा लोकसभा निवडणूकीशी संबंध; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

जयंत पाटील यांच्याविरोधातील या कारवाईनंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. सांगली, पुणे आणि नाशिकमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करणार आहेत. इतकेच नाही तर राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

NCP Jayant Patil
IPL 2023 : धोनीच्या चेन्नईला प्लेऑफआधी मोठा धक्का! दिग्गज ऑलराऊंडर IPL मधून बाहेर

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील यांना ईडीने आयएल आणि एफएलएस प्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून मोठा आर्थि गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.