Jehangir Art Gallery : जेजुरीच्या शिक्षक चित्रकाराचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन

निसर्गाचा सुंदर अनुभव देणारे हे प्रदर्शन 26 सप्टेंबर पासून सुरू झाले असून ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वांसाठी खुले
Jejuri teacher painter exhibition at Jehangir Art Gallery mumbai
Jejuri teacher painter exhibition at Jehangir Art Gallery mumbaisakal
Updated on

मुंबई : जेजुरी जवळील मातोश्री जिजाबाई विद्यालयामध्ये ते कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय शिंदे यांच्या पेंटिंग चे हे दुसरे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत लागले आहे. निसर्गाचा सुंदर अनुभव देणारे हे प्रदर्शन 26 सप्टेंबर पासून सुरू झाले असून ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वांसाठी खुले आहे.

शिंदे हे कला शिक्षक व निसर्ग चित्रकार आहेत . असून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यांच्या या प्रदर्शनामध्ये त्यांनी जलरंग व अक्रॅलीक या माध्यमामध्ये रंगविलेली निसर्गचित्र प्रदर्शित केली आहेत. त्यामध्ये जेजुरी गडावरील सोमवती यात्रेतील भाविकांची गर्दी, तेथील भंडाऱ्याची उधळण केलेली चित्र असून वारी तसेच गणपती विसर्जन मिरवणूक असे विषय असलेले चित्र यात आहेत. त्याचबरोबर गावातील घरे ,डोंगर, माळरान तसेच जलाशय व झाडांबद्दलची अनुभूती त्यांनी कॅनव्हासवर सुंदर पद्धतीने चित्रित केली आहे.

पुरंदर तालुक्यातील मावडी कडे पठार या खेडेगावात त्यांचा जन्म व शालेय शिक्षण झाले दहावीनंतर चित्रकला शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारा डिप्लोमा करण्यासाठी त्यांनी ओतूर मधील शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालयात फौंडेशन या वर्गात प्रवेश घेतला. कॉलेज मध्ये शिकत असताना आऊट डोअर स्टडी च्या निमित्ताने कॉलेज व्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी

शिंदे यांनी महाविद्यालयात शिक्षण घेताना आणि शिक्षक झाल्यानंतर ओतूर, जुन्नर,माळशेज घाट,ओझर, लेण्याद्री या भागामध्ये निसर्ग चित्र रंगविण्यासाठी भरपूर भटकंती केली तसेच प्रा.विश्वनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनामुळे याच काळामध्ये दत्ता शिंदे यांना निसर्गचित्राची आवड लागली व तो सातत्याने निसर्ग चित्र रंगवू लागेल,

पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना त्याने पुणे विद्यापीठ, पर्वती, सिंहगड किल्ला तसेच मंडई ,कसबा पेठ परिसराची दृश्य जलरंग माध्यमामध्ये रंगविली.तसेच अनेक स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला व पुरस्कार ही मिळविले.सासवड, पुणे, कोलकाता, मुंबई अशा विविध ठिकाणी त्याच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत.

महाराष्ट्राराज्याला चित्रकलेची व चित्रकला शिक्षणाची मोठी परंपरा आहे .शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी चित्रकला या विषयाचे खूप महत्वाचे योगदान आहे . महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जेथे शालेय स्थरावर चित्रकला विषय शिकविण्यासाठी प्रशिक्षित कला शिक्षक नेमण्याची शतकभराची परंपरा आहे.

आज महाराष्ट्रातील शहरा पासून ते गाव खेड्या पर्यंत असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला विषयाचे अध्यापन करणारे चित्रकला शिक्षक अनेक अडचणींचा सामना करून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे शिक्षण देत आहेत व त्यांच्यातील कलागुणांची जोपासना करत आहेत या बरोबरच स्वतःची चित्रकला ही जोपासत आहेत .

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेजुरी जवळील साकुर्डे या गावातील मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालयात ते चित्रकला शिक्षकाची नोकरी करू लागले . सुरुवातीला कमी पगार मिळत असल्यामुळे चार-पाच वर्षे चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची ही अडचण येत होती.

परंतु चित्रकलेचा रियाज सातत्याने चालू होता. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. नंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. मुंबई च्या जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शन भरविणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते .दत्तात्रय या प्रसिद्ध गॅलरीमध्ये भरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.