Thane: कोणाकोणाच्या सुपारी वाजवायचे हे आम्हाला माहित; आव्हाडांची पवारांवर टिका

पवारांवरील टीका: आव्हाड म्हणतात, 'सत्ताधार्यांची अडचणी आम्हाला माहित'
jitendra awad vs ajit pawar
jitendra awad vs ajit pawar sakal
Updated on

Thane: विरोधी बाकावर असतांना अजित पवार यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाही, याची व्युव्ह रचना नेहमी करत होते, मी एकदा सिडकोचे प्रकरण काढले होते, तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते.

परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही, तुम्ही कशा कोणाकोणाच्या सुपारी वाजवायचे हे आम्हाला माहित असल्याचा गौप्यस्फोट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

jitendra awad vs ajit pawar
Jitendra Awhad : शरद पवार नावाचे मनगट आमच्याकडे; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटाला टोला

अजित पवार सांगितील तसेच शरद पवार करीत होते, हीच मोठी चुक शरद पवार यांची झाली असल्याचेही ते म्हणाले. प्रफुल पटेल यांच्या उमेदवारीवरुन त्यांनी छेडले असता, प्रफुल पटेलांनी सांगावे, पक्षात कोणाकोणाला आमदार, खासदार व्हायचे होते, त्यातही वंशाला खासदार व्हायचे होते. म्हणून प्रफुल पटेलांना पुन्हा खासदार केले, पक्षात भांडण लागले होते, अनेकांना स्वप्न पडली होती, पण खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेल भाई ठरले असल्याचेही ते म्हणाले.

वरीष्ठांच्या घरी जन्मी आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो असे अजित पवार म्हणाले, मात्र तुम्हाला कोणी रोखले होते असा सवाल उपस्थित करीत तुम्ही कोणत्या आंदोलनात, कोणत्या कार्यक्रमात सहभाग झालात, आपण सत्तेसाठी जन्माला आला आहात, आपल्या डोक्यात कायम हेच खुळ होते, रस्त्यावर आंदोलन केले का?

jitendra awad vs ajit pawar
Ajit Pawar यांचा Praful Patel यांना पुन्हा उमेदवारी देण्यामागे नेमका डाव काय? Inside Story

ते आधी सांगावे असा असे थेट आव्हानही त्यांनी केले. तुमच्या अंगावर साधी पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेच राजकारण नेहमी करत राहिलात तेही शरद पवारांचे नाव वापरून, तुम्ही रक्तात नव्हतात, तरी रक्ताततच होता, म्हणून तुम्ही आमदार झाला, मंत्री झालात, त्यानंतर सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती. तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती, तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली, ती शरद पवारांची चूक होती असेही ते म्हणाले.

दरम्यान, ओबीसी, एसटी यांचा निधी थांबवण्याचे काम कायम अजित पवारांनी केले. जातीयवाद पाळणारा कोणता मंत्री असेल तर ते अजित पवार आहेत अशी टिकाही त्यांनी केली. राष्टÑवादी शरद पवार हे नाव पक्षाला मिळाल्यानंतर तुम्ही त्या नावाच्या विरोधात हे आम्हाला माहित नाही का? शरद पवारांचे नावच तुम्हाला नको असेही ते म्हणाले. मला तुमच्याकडून आणि शरद पवार यांच्याकडूनही काही नको, माझे स्वत:च्या बापापेक्षा शरद पवारांवर अधिक प्रेम असल्याचेही त्यांनी सांगितले.

jitendra awad vs ajit pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar: Rahul Narvekar यांचा निकाल काय सांगतो? | NCP MLA Disqualification

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.