जितेंद्र आव्हाडांकडून बाबा कालीचरणविरोधात गुन्हा दाखल

कालिचरणने महात्मा गांधींविरोधात गरळ ओकली होती.
Jitendra Awhad files FIR against Baba Kalicharan
Jitendra Awhad files FIR against Baba Kalicharangoogle
Updated on

ठाणे : तथाकथित धार्मिक नेता बाबा कालिचरण याने रायपूर येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात गरळ ओकली होती. याविरोधात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी (बुधवारी) नौपाडा पोलिसांत कालिचरणविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर "आता फॅसिझमविरोधात मैदानात उतरुन लढावचं लागेल," असं ट्वीटही आव्हाड यांनी केलं. (Jitendra Awhad files FIR against Baba Kalicharan)

आव्हाड म्हणाले, "फॅसिझमविरुद्ध मैदानात उतरून लढावंच लागेल. गोडसेच्या पाठिराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता बाबा कालीचरणविरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे"

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. रायपूर येथे बाबा कालीचरण यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात जे अपशब्द वापरले त्याविरोधात आम्ही गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर गांधीहत्येचं समर्थन करत त्यानं नथुराम गोडसेबाबत गौरवौग्दार काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनं पुन्हा या वक्तव्याचं समर्थन केलं. तसेच माझ्यामध्ये जे येतील त्यांना मी कापून टाकेन अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याआधीही झालेल्या भाषणांमध्येही त्यानं द्वेष पसरेल अशी भाषा वापरली, यासाठी त्याच्यावरती मी स्वतः गुन्हा नोंदवलेला आहे. कलम २९४, कलम २९५ अ, २९८, ५०५-२, ५०६-२, आयपीसी ३४ अशा सहा कलमांतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पुढची कारवाई पोलीस करतील" अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.