म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी सोडत; वाचा सविस्तर

ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा 24 ऑगस्टला शुभारंभ
Mhada
Mhadasakal media
Updated on

मुंबई : कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत (housing projects)  8 हजार 984 सदनिकांच्या विक्री (apartment on sale) करिता 23 ऑगस्टपासून सोडत जाहीर (lottery) करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी (online application) व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांच्या हस्ते मंगळवार (ता.24) ऑगस्ट रोजी  'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

Mhada
मुंबईत लसीकरणाची विक्रमी नोंद ; एका दिवसात 2 लाखांचा टप्पा पार

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित 'गो - लाईव्ह' कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील व अर्ज नोंदणीची सुरवात 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून होणार आहे.  नोंदणीकृत अर्जदार 24 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. इच्छूक अर्जदार 22 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील आणि  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 23 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ 24 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन बँकेत आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा 24 सप्टेंबर रात्री 11. 59 वाजेपर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

कोंकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत 6 हजार 180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोन येथे 624 सदनिका, खोणी येथे 586 सदनिका, खोणी येथे 2016 सदनिका, भंडारली येथे 1769 सदनिका, गोठेघर येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

Mhada
चित्रपट निर्माते प्रदीप गुहा कालवश!

तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) 15 सदनिका सोडतीत आहेत.  अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील 1 हजार 742 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली येथील 88 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे 36 सदनिका, वेंगुर्ला येथे 2 सदनिका मिरा रोड येथे 196 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक 491, २३ पार्ट वेंगुर्ला येथे 1 सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ता. वसई, जि. पालघर चंदनसर येथे 8, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे 76 सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे 23 सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) 16 सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे 2 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

Mhada
म्हाडा, एमआयजीच्या वादात महापालिकेची उडी; जाणून घ्या प्रकरण

अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे 16 सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे 116 सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे 1 सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे 35 सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे 28 सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे 140 सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे 21 सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे 24 सदनिका, अगासन-ठाणे येथे 47 सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे)   येथे 62 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 11 येथे 40 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 8 येथे 51 सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे 68 सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे 20 सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कोंकण मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याअनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत 14 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.