Thane News : आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात रामाचा जयघोष; राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी वाटले झेंडे

२२ जानेवारीला आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
Thane News : आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात रामाचा जयघोष; राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी वाटले झेंडे
Updated on

ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्री राम यांच्या बाबत वादग्रस्त विधानकरून रोष ओढवून घेतला होता. त्यामुळे त्यांच्या या विधानान्त्र त्यांच्यावर चौफेर टीका होवू लागली आहे.

अशातच त्यांचा मतदार संघ असलेल्या कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील कळवा भागात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या माजी नगरसेवकांनी श्री रामाचा जयघोष देण्यास सुरुवात केली असून ८ हजार झेंड्यांचे वाटप केले आहे.

तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिन निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आव्हाडांच्याच पक्षातील व त्यांच्याच मतदार संघातील माजी नगरसेवकांनी आव्हान दिले असल्याचे दिसून येत आहे.

२२ जानेवारीला आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. तदपूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रवक्ते म्हणून बोलताना, प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केले.

त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. तर, दुसरीकडे सर्वत्र राममय व भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. अशात ठाणे शहरातील विविध भागात राम मंदिराच्या निमित्ताने कुठे झेंडे तर कुठे निमंत्रण तर कुठे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच कळवा भाग मागील काही दिवस काहीसा अल्पीत होता.

परंतु आता येथील इमारतीच्या प्रत्येक घरावर चाळीतील घरांवर प्रभु श्री रामाचे झेंड झळकू लागले आहेत. परंतु हे झेंडे भाजप किंवा शिवसेनेकडून दिले गेले नसून जितेंद्र आव्हाड यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी येथील रहिवाशांना देऊ केले आहेत.

एका पदाधिकाºयाने तर आपल्या कार्यालयातच झेंडे उपलब्ध करुन दिले असून ज्यांना हवे असतील त्यांनी ते मोफत घेऊन जावेत असे आवाहन केले आहे. दुसरीकडे आणखी एका माजी नगरसेवकाने या निमित्ताने महाआरतीचे आयोजन केले आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर प्रसारीत केला आहे.

दरम्यान, एकीकडे शहरभर भाजप आणि शिवसेनेकडून झेंडे वाटप आणि इतर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपचा मोर्चा कळवा भागात होता. मात्र, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी त्यांच्या प्रभागात झेंडे वाटप केल्याने भाजपला ही संधीच मिळाली नसल्याचीही चर्चा कळवा भागात रंगू लागली आहे.

प्रभु श्री राम हे जसे प्रत्येकाच्या मनात आहेत, तसेच ते या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात दिसावे या उद्देशाने झेंडे वाटप करण्यात आले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

- मंदार केणी, माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.