मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास वादात छोटा शकीलच्या भावाची उडी ; गुन्हा दाखल

ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, गुन्हे शाखेकडून दोघे अटक
crime news
crime newssakal media
Updated on

मुंबई : जोगेश्वरी (jogeshwari) येथील झोपडपट्टी पुनर्विकास (slum redevelopment) योजनेतील वादात आता गँगस्टर छोटा शकीलचा (gangster chhota shakeel) भाऊ अन्वरने उडी घेतली असून त्यासाठी जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिकाला (builder) अन्वरने व्हीओआयपी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी (international call) करून धमकावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने (crime branch) अन्वरची (anwar)मदत घेणा-या दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तक्रारदार मोहम्मद वसिम अस्लम लष्करीया हे जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे जोगेश्वरी इन्फेनिजी मॉलजवळ झोपु योजनेअंतर्गत एक प्रकल्प सुरू आहे. त्यातील अपात्र झोपड्यांवरून शेख मोहम्मद अरबाज नईम व कामरान खान ऊर्फ राजू यांच्यासोबत वाद सुरू होता. त्या वादातून नईम याने प्रकल्पातील अपात्र झोपड्यांच्या बदल्यात रुमची मागणी केली होती. या वादात पुढे गँगस्टर छोटा शकीलचा भाऊ शेख नासिर अहमद अन्वर याने उडी घेतल्याची चर्चा आहे.

crime news
आपल्या अटींनुसार व्यापार करणे हा स्वदेशीचा खरा अर्थ - मोहन भागवत

या वादात नईम शेखच्या सांगण्यावरून अन्वरने जोगेश्वरीतील बांधकाम व्यावसायिक अस्लम लष्करीया यांना धमकावले. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांच्या मोबाईवर आंतरराष्टीय दूरध्वनी व संदेश पाठवून धमकावण्यात आले आहे. आरोपीने स्वतःचे नाव छोटा शकीलचा भाऊ अन्वर सांगून नईमच्या मागणीप्रमाणे फ्लॅटची मागणी केली आहे. तसेच न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. धमकीनंतर बांधकाम व्यवसायिकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती.

त्यानुसार याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात भांदवि कलम 387 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांनी याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचेही समजले. हे दूरध्वनी कराचीतून आल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

crime news
फेरीवाल्यापासून ते सराईत गुन्हेगार ; रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोण आहे अन्वर?

1993 बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून अन्वरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आले आहे. गॅंगस्टर छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेख याला डिसेंबर, 2018 दुबईच्या विमानतळवार तेथील सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले होते. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या अन्वरकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2008 मध्येही अन्वरला दुबईत अटक करण्यात आली होती; मात्र पुराव्यांअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. नव्वदीच्या दशकात मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरात तो वास्तव्यास होता.

छोटा शकीलपासून फारकत घेतलेला अन्वर गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला होता. त्या वेळी नामांकित व्यक्तींना खंडणीसाठी धमकावणे यासह बऱ्याच देशद्रोही कारवाईत त्याचा सहभाग आहे. त्याच्या कामात त्याचा भाऊ अन्वर हादेखील त्याला मदत करायचा. डी कंपनीचा बहुतांश कारभार हा सध्या शकील आणि त्याचा भाऊ अन्वर संभाळत होते.

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने त्याला हाताशी घेतल्याचेही बोलले जाते. त्यामुळे 2004 पासून मुंबई पोलिसांच्या वॉंटेड आरोपींच्या यादीत त्याचा सहभाग करण्यात आला होता. 1988 मध्ये शकील व दाऊद यांनी पाकिस्तानात पलायन केले होते. त्या वेळी अन्वर अंधेरीत बांधकाम व्यवसाय करत असे. या वेळी तो शकीलचा आर्थिक व्यवहार सांभाळत होता. अन्वर विशेष करून हवालामध्ये सक्रिय होता. डी कंपनीच्या खंडणीचा पैसा पाकिस्तानात त्यांच्यामार्गेच पोहोचायचा. पुढे त्याचा वापर मुंबई व गुजरातमधील दहशतवादी कारवायांमध्ये करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.