कोरोना संकटामुळे सुटीवर असलेले 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू

कोरोना संकटामुळे सुटीवर असलेले 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू
Updated on

मुंबई ः कोरोना संकटात 55 वर्षांवरील पोलिसांना सुटीवर पाठवल्याला सहा महिने झाले असून, सध्या अनेक पोलिस कामावर रुजू होऊ लागले आहेत. अशा पोलिसांना सध्या कमी जोखमीची कामे देण्यात येत आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच 55 वर्षीय पोलिसांना कामावर रुजू होण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार काही पोलिस रुजू होत असून, त्याला 12 तास कमी जोखमीचे काम देण्याचे आदेश आहेत. याशिवाय त्यांच्यासाठी 48 तासांचा आरामाचा कालावधी ठेवला आहे. लॉकडाऊनकाळात सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र पोलिसांना तैनात केले होते. त्या काळात थेट संपर्कात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात 55 वर्षांच्या वरील पोलिसांना कोरोनाचा अधिक धोका लक्षात घेता त्यांना सुटीवर राहण्याचे आदेश दिले होते. याशिवाय 50 वर्षांवरील पोलिसांनाही कमी जोखमीचे काम देण्याचे आदेश होते. 

मुंबई पोलिस दलातील सुमारे सहा हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. मे-जून महिन्यात मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर जुलै-सप्टेंबरमध्ये कमी आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून 55 वर्षांवरील पोलिस सेवेत रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना सध्या कार्यालयात राहून कमी जोखमीची कामे करण्यास सांगण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबरपासूनच काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याने दूरध्वनी करून पुन्हा सेवेत रुजू होण्याची विनंती केली. त्याला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 6797 वर पोहोचला आहे. त्याशिवाय 92 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Join the police force who have been on leave for over 55 years due to the Corona crisis

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.