Osho Ashram : पुण्यातील ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाहीच, 107 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती

पुण्याच्या ओशो आश्रमातील दोन भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
osho ashra,
osho ashra,sakal
Updated on

पुण्याच्या ओशो आश्रमातील दोन भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे. सह धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाने या व्यवहारांना तीव्र विरोध केला होता.

ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट चालवणाऱ्या ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनचा (ओआयएफ)मुंबईतील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हे दोन मुख्य भूखंड विकण्याची परवानगी मागणार अर्ज केला होता. यानंतर ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाने याला जोरदार विरोध केला. यादरम्यान ही परवानगी नाकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे 107 कोटींचा हा व्यवहार स्थगित झाला आहे.

osho ashra,
Ajit Pawar News : अजितदादांनी भाजपच्या दबावात सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडणे अयोग्य; काँग्रेस नेत्याचा सल्ला

ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने सुमारे 9,800 चौरस मीटरचे दोन भूखंड उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाशी संबंधीत ट्रस्टला 107 कोटी रुपयांना विकण्याची परवानगी मागितली होती. ओशोंच्या शिष्यांच्या बंडखोर गटाने याला विरोध करत ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप केले होते.

या व्यवहाराला परवानगी नाकारताना, सह धर्मादाय आयुक्त आर यू मालवणकर यांनी 7 डिसेंबर रोजी पारीत केलेल्या आदेशात ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला "राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्टकडून मिळालेली 50 कोटी रुपयांची रक्कम व्याजाशिवाय परत करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

osho ashra,
Winter Session 2023 : शेतकरी, मराठा आरक्षण कळीचे मुद्दे; दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात, वादळी चर्चा अपेक्षित

ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन यांची मालकी असलेल्या या आश्रमात जगभरातून लोक येतात. एकून दीड एकर प्रत्येकी असे दोन भूखंड मिळवण्यासाठी या जागेशेजारी बंगला असलेल्या राजीव बजाज यांनी सर्वाधिक बोली लावली होती. त्यांनी या जागेसाठी 107 कोटी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सह धर्मादायी आयुक्तांनी यासाठीची परवानगी नाकारली आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.