: Jumbo Covid Center Scam: जम्बो कोविडसेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भागिदारी करार खोटा असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच सरकारी तिजोरीचे १५ कोटी ३१ लाखांचे नुकसान झाल्याचे देखील म्हटले आहे.
कंत्राट मिळवण्यामध्ये अनमियतता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी सुद्धा दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु आता सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सुजित पाटकर यांनी डाक्टरांच्या सहाय्याने कोविट सेंटरच्या माध्यमातून पालिकेला कोटीचा गंडा घातला आहे. कोणताही अनुभव नसताना आपण अनुभवात पात्र आहोत, असं दाखवण्यात आलं.
तसेच डॉक्टर तसेच सपोर्ट स्टाफच्या खोट्या सह्या, खोटी कागदपत्रे, बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.