पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला- सुप्रिया सुळे

पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला- सुप्रिया सुळे
पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला- सुप्रिया सुळे
Updated on

रायगड : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला, तेव्हा या अर्थसंकल्पात शेवटच्या घटकाला न्याय मिळाल्याचे दिसून आले. विशेषत: पुन्हा एकदा कोकणाला झुकते माप देऊन कोकणाच्या विकासाला एकप्रकारे चालना मिळाली. अनेक वर्षे या भागाचा विकास रखडला होता. आता कुठेतरी या विकासाला चालना मिळताना दिसत आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला महामेळाव्यात त्या बोलत होत्या.

ही बातमी वाचली का? ठाण्यात जंतुमिश्रित पाणी! तुमच्या पाण्यात तर नाही ना...
 
यावेळी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, बबन मनवे, जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा, दीपिका चिपळूणकर, जि. प. सदस्या उमा मुंडे, जि. प. सदस्या गीता जाधव, दयाराम पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ, नंदू म्हात्रे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर सकपाळ, गीता पडवळ, सरपंच वसंत भोईर, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

खासदार सुळे म्हणाल्या, कोरोना व्हायरसमुळे चीनमधील आयात होणाऱ्या वस्तूंची खरेदी बंद झाली असल्याचा फायदा महिला उद्योगाने घेऊन वेगवगळ्या वस्तू निर्मितीवर भर देणे आवश्‍यक आहे. जेणेकरून आपल्याच राज्याचे अर्थकारण महिला उद्योगाच्या माध्यमातून भरभराटीला येऊ शकते. आज युवापिढीची ओढ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे जास्त आहे. नवीन पिढीमुळे संघटना बांधण्याची संधी मोठी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला गळती लागली होती. अशा परिस्थितीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाला बळकटी आणण्यासाठी कोणतीही पर्वा न करता राज्यात 54 विधानसभा सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले. यावरच न थांबता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांची महविकास आघाडी बनवत सरकार स्थापन केले. यात महिलांना मोठे स्थान दिल्याचे पालकमंत्री अदिती तटकरेच्या रूपाने सबंध रायगडकरांनी पाहिले आहे. महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले असले तरी, मी आणि अदिती आरक्षणाव्यतिरिक्त खुल्या गटात निवडून येऊ शकतो. म्हणजेच यापुढे जवळ जवळ 70 टक्के जागा या महिलांनी व्यापलेल्या दिसून येतील. महिला सक्षमीकरणात शरद पवारांचा मोठा वाटा असल्याचे त्या म्हणाल्या. 

पवारांनी महाराष्ट्र जपला 
खासदार सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना देशात महिलांसाठी धोरण राबविले. गेली पन्नास वर्षे शरद पवारांनी महाराष्ट्र जपला. रायगडात मेडिकल कॉलेज आणण्याची घोषणा मी दहा वर्षांपूर्वी केली होती. आज खऱ्या अर्थाने ती पूर्णत्वास येत आहे. याशिवाय कोकण रेल्वे व महामार्गासाठी वाढीव निधी आणून मार्ग सुखकर केला. कुठल्याही सरकारमध्ये कोकणाला जेवढा निधी मिळाला नव्हता तेवढा निधी आपण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.