Kalamboli News : बेपत्ता तरुणीची प्रियकराने हत्या केल्यानंतर स्वत:ही संपविले जीवन

कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने गळा आवळुन हत्या केल्याची व त्यानंतर त्याने स्वत: देखील लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
Vaibhav Burungale and Vaishnavi babar
Vaibhav Burungale and Vaishnavi babarSakal
Updated on

नवी मुंबई - कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने खारघर येथील टेकडी परिसरात गळा आवळुन हत्या केल्याची व त्यानंतर त्याने स्वत: देखील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महिन्याभरानंतर उघडकीस आली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने खारघर टेकडी परिसरात 10 दिवस अथक शोध मोहिम राबवून तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शोधून काढल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

या घटनेतील मृत वैष्णवी मनोहर बाबर (19) ही तरुणी कळंबोली सेक्टर-1 मध्ये कुटुंबासह राहण्यास होती. तसेच ती मुंबईतील सायन येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर तिची हत्या करणारा तिचा प्रियकर वैभव बुरुंगले (24) हा देखील कळंबोली राहत होता. या दोघांचे मागील 5 वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता.

त्यामुळे वैभवने वैष्णवीची हत्या करुन आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वैभव गत 12 डिसेंबर रोजी सायन येथे वैष्णवीच्या कॉलेजमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने तिला सोबत घेऊन खारघर टेकडीवरील दुर्गम झुडपात नेऊन पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱया पट्टीच्या सहाय्याने तीचा गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्याने जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलमसोर उडी घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर वैभव च्या मोबाईलवर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने वैष्णवीवी हत्या केल्याचे व स्वत: देखील आत्महत्या करत असल्याचे आढळुन आले होते. तर दुसरीकडे बेपत्ता झालेल्या वैष्णवीचा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून शोध घेण्यात येत होता.

त्यासाठी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने वैष्णवी व वैभव या दोघांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली.

यात वैष्णवी बाबर व वैभव बुरुंगले हे दोघेही 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यत दोघेही एकत्र खारघर हिल्स परिसरात असल्याचे दिसुन आले. तसेच त्याच दिवशी वैभव याने वैष्णवीची हत्या करुन जुईनगर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केल्याचे त्याच्या मोबाईलमधील सुसाईड नोटवरुन उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी 10 दिवस येथील दुर्गम भागात वेगवेगळ्या माध्यमातून शोध मोहिम राबवुन वैष्णवीचा मृतदेह शोधुन काढला.

सुसाईड नोटस मधील सांकेतिक शब्द एल01-501 मुळे लागला तरुणीच्या मृतदेहाचा शोध

वैभवने ज्या ठिकाणी वैष्णवीची गळा आवळून हत्या केली. त्या ठिकाणावरील झाडांच्या मोजणीसाठी वन विभागाने (एल 01-501) टाकलेला नंबर वैभवने आपल्या सुसाईड नोटमध्ये टाकला होता. मात्र एल01-501 या सांकेतिक शब्दाचा अर्थ पोलिसांना सुरुवातीला लक्षात आला नाही.

त्यामुळे पोलिसांनी 10 दिवस येथील दुर्गम भागात वेगवेगळ्या माध्यमातून वैष्णवीच्या मृतदेहाचा शोध घेतला. मात्र त्यांना मृतदेह सापडला नाही. पोलिसांनी नंतर वन विभागाच्या मदतीने एल01-501 या नंबरच्या झाडांचा शोध घेतल्यानंतर त्याच झाडाजवळ वैष्णवीचा कुजलेला मृतदेह सापडला.

पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्याचा वैभवचा विश्वास

वैभवने मागील तीन महिन्यापासून वैष्णवीच्या हत्येची योजना आखल्याचे त्याने लिहून ठेवलेल्या 8 पानी चिठ्ठीमधील मजकुरावरुन आढळुन आले आहे. त्यात त्याने पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्यासाठी ज्या दिवशी वैष्णवीची हत्या करणार, त्याच दिवशी तो देखील जीवन संपवणार असल्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे आढळुन आले आहे.

विशेष म्हणजे वैभव याने लोकलसमोर आत्महत्या करण्यापुर्वी देखील आपल्या मोबाईलवर मेसेज टाईप करुन वैष्णवीची हत्या केल्याचे तसेच सदरचा मोबाईल आपल्या कुटुंबियांना अथवा पोलिसांना देण्यास सांगितल्याचे आढळुन आले आहे.

अमित काळे (पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा) -

वैभव आणि वैष्णवी या दोघांमध्ये पाच वर्षापासून प्रेमसंबध सुरु होते. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. मात्र दोघांची जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यातच मागील काही महिन्यांपासून वैष्णवीला एका तरुणाचा फोन येत होते.

त्यामुळे वैष्णवी त्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा वैभवला संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडण देखील होत होते. यावरुन वैष्णवी आपल्यापासुन दुरावत असल्याच्या वैभवला संशय होता, त्यामुळेच त्याने वैष्णवीची हत्या केल्याचे आढळुन आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.