मुंबादेवी - काळबादेवी बदामवाडी येथे धोधो कोसळणाऱ्यापहिल्याच पावसात दुरुस्तीसाठी बांबूच्या आधारावर तग लावून धरलेल्या जालान इमारातीने अखेरचा श्वास घेत अंग सोडले. सुदैवाने इमारत कोसळण्याची चाहूल लागल्याने आठ दहा युवकांनी जीव धोक्यात घालून इमारतीतील कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला म्हणून कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही.जर या युवकांनी धैर्य दाखवीत शूरवीर पणाचे दर्शन घडविले नसते तर मात्र मोठ्या दुःखद प्रसंगाला तोंड द्यावे लागले असते.
या संदर्भात येथील काळबादेवी गणेश मंडळ, काळबादेवीचा राजाचे अध्यक्ष मनोज अमरे यांनीजालान भवन इमारतीचा काही भाग कोसळताना पाहिला आणि सहकारी मित्र अरुण बडदे, मोहन मस्के, उमेश केमसे, दीपक घाडगे, विजय आटूगडे, अरबाज खान, शमिम शेख यांनी ताबडतोब धावपळ करीत अवघ्या वीस मिनिटात 40 लोकांना बाहेर काढले. काही मिनिटात इमारत धाडकन कोसळली. काही वेळात अग्निशमन दल, पोलीस, पालिका अधिकारी आपापल्या वाहनातून बचाव कार्यासाठी आले.
काळबादेवीरोड वरील 339/341 या 5 मजली इमार तीचा काही भाग गुरुवार ता.30 रोजी दुपारी 12:30 वाजता कोसळला त्या नंतर अवघ्या अर्ध्या तासात हि इमारत धाडकन कोसळली.या इमारतीत तळ मजला 9 रूम असे धरून 5 मजले मिळून 45 अनिवासी गाळे होते. त्यात विविध कंपन्याची कार्यालये होती ती त्यात उध्वस्त झाली.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मदन वर्मा, विमल वर्मा, सकल पंडित, भरत भाई, विवेक मिश्रा, हरी मिश्रा, केतन राजपूत हि लोकं प्राईम नेटवर्क कुरियरचे, बॉम्बे आंध्र कुरियर अशा विविध छोटया छोटया दुकाने आणि कंपनीत काम करीत होते. त्यांचा जीव वाचविल्याचे समाधान मनोज अमरे यांनी व्यक्त केले.
यातील जीव वाचलेले मदन वर्मा म्हणाले कि आमचा जीव वाचला हा पुनर्जन्म झाला आहेनेमके काय बोलावे हेच सुचत नाही. श्री गणेशाच्या कृपेने जीव वाचला असेच म्हणावे लागेल.मी,हरी मिश्रा आणि अन्य लोकांना या तरुणांनी बहादुरी दाखवित सुरक्षित बाहेर काढले याचे मोठे आभार मानतो.
किशोर येरमे (सहाय्य्क आयुक्त,पालिका सी विभाग) यांनी या संदर्भात सांगितले कि, जालान भवन हि सेस इमारत असून म्हाडा कडून दुरुस्ती सुरु होती.त्याच दरम्यान कोसळली.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.अत्यंत धोकादायक अशा सी वन इमारती आम्ही तात्काळ खाली कराव्यात अशी नोटीस घरमालकआणि भाडेकरूना बजावल्या आहेत. लोकांनी पालिकेला सहकार्य करावे.
आम्ही या बाबत लोकांना विनंती केली आहे कि धोकादायक इमारतीत राहून जीव गमावण्यापेक्षा सुरक्षित स्थळी जावे.
- मनोज अमरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.