Thane News : सहकार शाळेत पोषण आहारातून विषबाधा; 40 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार विद्यालयात मंगळवार (ता 1) ला शालेय पोषण आहारातून सुरवातीला 38 व त्यानंतर 8 अश्या ४६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापन आणि आहार पुरविणाऱ्या बचत गटातील संबंधित व्यक्तींविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
kalva school Food poisoning case
kalva school Food poisoning case sakal
Updated on

कळवा: कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार विद्यालयात मंगळवार (ता 1) ला शालेय पोषण आहारातून सुरवातीला 38 व त्यानंतर 8 अश्या ४६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापन आणि आहार पुरविणाऱ्या बचत गटातील संबंधित व्यक्तींविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. बुधवार दुपारपर्यंत ३३ विद्यार्थ्यांना तर 7 विद्यार्थ्यांना सायंकाळी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती सहकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गावीत यांनी सांगितले.

कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाची शाळा आहे. मंगळवारी दुपारी येथील पाचवी आणि सहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला होता. यामध्ये मटकीची आमटी आणि भाताचा सामावेश होता. हा आहार केल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या आधी 38 व त्यानंतर 8 अश्या ४६ विद्यार्थ्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ३७ विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत आहे.

तर उर्वरित आठ विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांची लक्षणे दिसत आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. बुधवार दुपारपर्यंत ३३ विद्यार्थ्यांवर उपचार करून सोडून देण्यात आले. तर याप्रकरणी पालकांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, शाळा व्यवस्थापन आणि पोषण आहार पुरविणाऱ्यांविरोधात निष्काळजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती डाॅक्टरांकडून घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.