ठाणे - मुंब्रा वासियांना खेळण्यासाठी एका मैदानाची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारला विनंती केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान लवकरच मुंब्रावासियांसाठी होणार असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंब्रा येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.