कळवा: नवजात अर्भकाला उघड्यावर ठेवून त्याचा जीव जावा या हेतूने परित्याग केलेल्या महिलेला महिलेला व तिच्या बहिणीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी (ता 8) रात्री साडे अकराच्या सुमारास स्री जातीचे नवजात अर्भक कळवा पूर्व भास्कर नगर आक्रम किराणा दुकानाच्या मागील देविकृपा चाळ येथे उघड्यावर ठेवल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्यातील रात्रपाळीत बंदोबस्ताचे काम करणारे सह पोलीस निरीक्षक करडे व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.निरीक्षक सागर संगवे यांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील महिला समाजसेवक व स्थानिक रहिवासी यांच्या मतदतीने त्या अर्भकाला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्वरीत या बालकाला नवजात सुरक्षा कक्षातील शिशुकाचपेटीत ठेवून त्याची तपासणी केली असता ते स्री जातीचे जिवंत अर्भक असल्याचे निष्पन्न झाले परित्याग केलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आजूबाजूच्या सीसीटिव्ही फुटेज मधून शोध घेतला असता त्यांना कृष्णानगर झोपडपट्टीमध्ये राहणारी कांचन गौड (वय 24) ही संशयित महिला सापडली.
तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे नवजात अर्भक तिच्या बहिणीला लग्नाआधी झालेल्या शारीरिक संबंधातून झाल्याचे कबूल केले लग्नाआधी शारीरिक संबंधातून मुल जन्माला आल्याने या मुलीच्या मूळ गावी (उत्तरप्रदेश) मध्ये तिची बदनामी होईल या भीतीने या अर्भकाला उघड्यावर ठेवून पळ काढल्याचे कबूल केले कळवा पोलिसांनी तिला अटक करून व तिची बहीण रोली अनिल प्रसाद गौड (वय 19) हिच्यावर अर्भकाचे परित्याग केल.
बहीण रोली अनिल प्रसाद गौड (वय 19) हिच्यावर अर्भकाचे परित्याग केल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला सदर महिला ओळी बाळंतीण असल्याने तिला पोलीस बंदोबस्तात कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.