कल्याण: आर्चीस सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने दोघे जखमी

 kalyan archis apartment
kalyan archis apartmentsakal media
Updated on

कल्याण : आर्चीस अपार्टमेंट (kalyan archis apartment) मधील घराचे स्लॅब प्लास्टर व हॉल मधील सिलिंग (selling slab collaps) कोसळले. तर हॉल मध्ये बसलेल्या घर मालक जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर सिलिंगची पीओपी शीट कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत (people injured) झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी (bmc fire brigade) घटनास्थळी त्वरित धाव घेत घरातील सामान शिफ्ट (shifting) करून तूर्तास दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले .

 kalyan archis apartment
वसई-विरारमध्ये राणे समर्थक एकाकी; भाजपचा काढता पाय

कल्याण पश्चिमे कडील स्टेशन नजीक असलेल्या आर्चीस अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावर राहणारे जावडेकर यांच्या राहत्या घरातील बेडरूम, हॉल मधील स्लॅब जीर्ण झाले असून स्लॅब मधील लोखंडी सळ्याना गंज लागल्याने सळया जीर्ण झाल्या असून स्लॅबचे प्लॅस्टर निघाल्याने केवळ लोखंडी सांगाडा उरलेला असल्याने स्लॅब धोकादायक बनलेला आहे.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमाराला जावडेकर यांच्या घरातील हॉल च्या सिलिंगचा स्लॅब अचानक पणे कोसळायला तसेच हॉल मधील सलिंगला लावलेली पीओपीची शीट हॉल मध्ये बसलेलले मकरंद जावडेकर व त्याच्या मुलाच्या अंगावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटने प्रकरणी त्वरित पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळी घाव घेतली.

जावडेकर यांच्या घरातील किचन , हॉल व बेडरूम च्या सिलिंगची पाहणी केली असता त्यांना सर्वच सिलिंग धोकादायक असल्याचे दिसून आले सिलिंगचे प्लॅस्टर ही निघाले असून लोखंडीसळ्या गंजलेल्या व प्लॅस्टर फुगलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्य स्लॅब कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने घरात राहणे धोकादायक असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी जावडेकर यांच्या कुटुंबियांना घरातील समान अन्याय ठिकाणी शिफ्ट होण्यास सांगितल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.