Latest Kalyan News: कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे. कल्याण मधील भाजप जिल्हा सचिव विलास रंदवे यांच्यासह कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी हा प्रवेश झाला आहे.
जर कल्याण पश्चिम मध्ये माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक वरूण पाटील आणि इतर भाजप पदाधिकारी यांनी बंडखोरी केली, तर आमच्या कडे कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड मतदार संघात बंडखोरी होऊ शकते असे यावेळी शिवसेना कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे म्हणाले.