...अन् कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा गजाआड

thief arrested
thief arrestedsakal media
Updated on

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway station) परिसरातून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून (Gold chain robbery) नेण्याचा प्रयत्न एका चोराने केला. मात्र महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत नागरिकांच्या मदतीने चोराला पकडले. नागरिकांच्या दणक्यामुळे (people trapped thief) चोराचा चोरीचा प्रयत्न असफल झाला. नागरिकांनी चोराला पकडून कल्याण जीआरपीच्या (GRP) ताब्यात दिले. उमाशंकर पांडे असे अटक (thief uma shankar pandey arrested) आरोपीचे नाव आहे.

thief arrested
"तेलबिया, तेल, कडधान्यांना वायदे बाजार प्रतिबंध स्वागतार्ह"

कल्याण डोंबिवली शहर तसेच रेल्वे हद्दीत चोरीच्या घटना वाढत आहे. पोलीस चोरट्यांवर कारवाई करत असले तरी चोरीच्या घटनांना आळा बसत नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मात्र एका चोराचा चोरीचा उद्देश असफल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे राहणाऱ्या वॉलसमा जॉर्ज ही महिला सोमवारी दुपारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून जात होती. यावेळी चोरटा उमाशंकर त्यांचा पाठलाग करत होता.

संधी साधत उमाशंकरने त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जॉर्ज यांनी आरडाओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. आजूबाजूच्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी देखील पाठलाग करून चोरास दणका दिला. चोरट्याला पकडून कल्याण जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. उमाशंकर याच्यावर याआधी देखील एक गुन्हा दाखल असून अधिक तपास केला जात असल्याचे कल्याण जीआरपी पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.