डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो 12’ मार्गिकेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या क्षेत्रात मेट्रोचे जाळे निर्माण करत आहोत. रस्ते, रेल्वे तसेच मेट्रो यामुळे चांगल्या सोयी सुविधा नागरिकांना मिळतील याचा आनंद असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी मेट्रो 12 या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा कल्याण मध्ये आले होते, तेव्हा त्यांनी मेट्रो 12 ची घोषणा करत संकल्पना केली होती. एमएमआरडीएमध्ये देखील आपण मेट्रोच जाळ निर्माण करतोय याचा आनंद आहे. उल्हासनगर पर्यत ही मेट्रो गेली पाहिजे. तसेच कांजूर मार्ग ते बदलापूर असा वेगळा मेट्रो मार्ग यामध्ये देखील आपलं सरकार काम करत आहे असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कसा आहे प्रकल्प
एमएमआरडीएच्या 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘मेट्रो 12’ प्रकल्प. 20.75 किमी लांबीची कल्याण – तळोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवर 19 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो 5’ मार्गिकेची विस्तारीत मार्गिका आहे.
कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबई या शहराला जोडण्याची निकड लक्षात घेता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो मार्ग-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) हा मेट्रो मार्ग विस्तारित करुन कल्याण ते तळोजा (डोंबिवली मार्ग) प्रस्तावित केला आहे. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सातत्याने पाठपुरावा होता.
ठळक वैशिष्ट्ये
• मेट्रो मार्गाची एकूण लांबी: 22.173 कि. मी. (उन्नत).
• एकूण स्थानके: 19 स्थानके (उन्नत).
• प्रकल्प पूर्णत्वाची किंमत: 5, 865 कोटी
• दैनंदिन प्रवासी संख्या: 2.62 लक्ष (2031-2032)
2.94 लक्ष (2041-2042)
प्रकल्प पूर्णत्वाची वेळः 30 डिसेंबर 2027
प्रकल्पाची सद्य:स्थितीः
स्थापत्य कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून नियुक्तीची प्रक्रिया प्रगती पथावर आहे.
प्रकल्पाचे फायदे
वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत: 45 मिनिटे (कस्याण-तळोजा).
ठाणे-भिवंडी-कल्याण आणि नवी मुंबई मेट्रो मार्गासह मेट्रो मार्ग 12 चे एकीकरण, ज्यामुळे मुंबई-ठाणे- भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना आत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येईल.
- मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील
- गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकोभोचती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना देऊ शकते.
- मुंबई मेट्रो मार्ग 12 वाहतुकीचा एक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित अपघातांचा धोका कमी होईल, हे रहिवासी आणि अभ्यागतांसाठी गतिशीलता वाढवू शकते.
- प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्ते बांधणी आणि देखभाल याचा खर्च कमो होईल.
- मुंबई मेट्रो मार्ग 12 सुरू केल्याने लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊ शकते आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.
- अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने, इंधनाच्या वापरात घट होईल, ज्यामुळे हरित वायू (Cireenhouse Gases) उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल.
- वायु प्रदूषण कमी होईल, डिझेल आणि पेट्रोलवर चालणान्या वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायु प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होईल.
- बसेस आणि ऑटो रिक्षांची वाहनांच्या संख्येत घट होऊ शकते, ज्यामुळे रस्त्यांवर कमी गर्दी होईल आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल व प्रवाश्यांना उत्तम आरामदायी व्यवस्था मिळेल, त्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल.
- सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल.
- या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.