Kalyan: दुर्गाडी किल्ल्याची जागा खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा होता घाट मात्र...

Durgadi Fort
Durgadi FortSakal
Updated on

Kalyan: कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची जागा खासगी संस्थेच्या नावावर करण्याचा घाट घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी तहसीलदार कार्यालयाच्या बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करण्यात आला आहे.

याप्रकरणी महसूल खात्यातील मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांच्या तक्रारीवरून सुयश शिर्के सातवाहन याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Durgadi Fort
Dhule Crime News : मुलींची छेडखानी महागात; देवपूरच्या घटनेप्रकरणी दोघे 6 महिने तुरुंगात

किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचा अध्यक्ष असलेला सुयश शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्या ठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला.

पण, ज्या जागेसाठी सातवाहन याने अर्ज केला आहे, त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी असल्याची तक्रार कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी केली आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित नव्हती.

‘कब्जेदार, दुर्गाडी किल्ला’ असे नाव दाखल असलेली सर्व्हे नंबर ३३८ (एकूण क्षेत्र १-१६-०० हेक्टर आर) ही जमीन समितीच्या नावावर दाखल करण्यासाठी २६ जून २०१४ रोजी शिर्के याने अर्ज दिला होता. या अर्जासोबत अर्जदाराने काही कागदपत्रे जोडली होती. या कागदपत्रांमध्ये दुर्गाडी किल्ल्याचा ७/१२ उतारा, फेरफार याचाही समावेश होता.

बनावट लेटरहेड
हा किल्ला माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीच्या नावे असलेले ८ मे २०२१ तारखेचे पत्र जोडण्यात आले होते. वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केले असता तहसीलदारांच्या नावाच्या बनावट लेटरहेडची कागदपत्रे बनवून त्यावर तहसीलदार कार्यालय प्रमुखाची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून ते लेटरहेडवर उमटवल्याचे समजले.

ही सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात दाखल करून ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गाडी किल्ला क्षेत्राच्या अभिलेखामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करून शासनाची फसवणूक केल्याचे मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

Durgadi Fort
Pune Crime : मॉडेल कॉलनीत पगारावरून झालेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.