Kalyan East Vidhansabha : कल्याण पूर्वेत काँग्रेस - ठाकरे गटात जागेवरून दावे प्रतिदावे

Uddhav Thackeray Vs Congress: एकटे लढण्याची वेळ आली तर आम्ही ही सीट लढवणार असा दावा काँग्रेसचे नवीन सिंग यांनी केला आहे.
Kalyan East Vidhansabha : कल्याण पूर्वेत काँग्रेस - ठाकरे गटात जागेवरून दावे प्रतिदावे
Updated on

Latest Kalyan News: कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात दावे प्रतिदावे रंगत आहेत. 2019 च्या निवडणूकित ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली होती. तर 2009 व 2014 मध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेली होती.

यंदा राज्यात महाविकास आघाडी असुन शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. ठाकरे गटाला उमेदवार आयात करावा लागेल, त्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असा दावा काँग्रेसने केला आहे. तर आमच्याकडे तीन सक्षम उमेदवार असल्याचा प्रतिदावा ठाकरे गटाने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.