Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर

Eknath Shinde Vs BJP: विधानसभा निवडणुकीत हा वाद आता कोणते वळण घेतो हे पहावे लागेल.
Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर
Updated on

latest Dombivali News: सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शहरात खड्ड्यांवरून बॅनर बाजी करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचे नाव पुढे आल्याने ते बुधवारी पोलिसांसमोर हजर झाले.

यादरम्यान डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने दडपशाही सुरू आहे त्याला आम्ही जुमानत नाही आम्ही आमचे काम करत राहणार असा इशारा म्हात्रे यांनी विरोधकांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीत हा वाद आता कोणते वळण घेतो हे पहावे लागेल.

Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर
जलवाहिनी फुटल्याने कल्याणमधील नागरिकांचे हाल

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांचा 20 सप्टेंबरला वाढदिवस होता. त्यानिमित्त डोंबिवली शहरात ठीक ठिकाणी त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर समर्थकांनी लावले होते.

त्यातच काही बॅनरने मात्र राजकीय वातावरण ढवळून निघाले. शहरातील खड्ड्यांची समस्या मांडत "हॅप्पी खड्डे डे" अशा आशयाचे बॅनर शहरात लागले होते. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बॅनर छपाई करणाऱ्या जॉली प्रिंटरच्या विरोधात शहर विद्रूपीकरण आणि सामाजिक तेढ निर्माण करत मंत्री चव्हाण यांची बदनामी केल्याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचे नाव पुढे आले.

Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर
कल्याण पश्चिमेतील मिठाईच्या दुकानाला आग

पोलिसांनी म्हात्रे यांना नोटीस बजावत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दीपेश म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर राहुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या समोर आपले म्हणणे मांडले आहे.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले, शहरामध्ये खड्ड्यांवरून काही ठिकाणी बॅनर लागले होते. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये माझं नाव आहे असं मला कळलं, मला त्या संदर्भात पोलिसांनी नोटीस दिली होती. आमचा पोलिसांवर कोणताही रोष नाही.

Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर
कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

परंतु ज्या पद्धतीने दडपशाही करण्याचं काम डोंबिवली विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. त्या दडपशाहीला मी कुठेही भिक घालत नाही. आम्ही आमच काम करत राहणार. शहरांमध्ये पडलेले खड्डे ही वस्तुस्थिती आहे. लोक ते बघतात, लोक मला योग्य तो न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर
Kalyan: स्थानिकांचा विरोध अन् मनसेच्या राजू पाटलांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; कल्याणमध्ये नक्की काय सुरु आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.