२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळालेला एकमेव मतदारसंघ अशी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची नवी ओळख निर्माण झाली आहे.
आगरी बहुल असा हा मतदारसंघ असून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा हा मतदारसंघ असल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष आहे. मैत्रीपूर्ण संबंध तसेच सत्तांतरात मनसेचा मिळालेला पाठिंबा यामुळे मनसे उमेदवाराच्या विरोधात महायुती येथे मवाळ भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट येथे जोरदार तयारीला लागला आहे. गेल्या निवडणुकीत ठाण्यातील दबाव तंत्रामुळे निवडणुकीतून माघार घेतलेले माजी आमदार सुभाष भोईर यांना ठाकरे गटाने रिंगणात उतरविले आहे.