मुंबई : सीएसएमटी ते कल्याणपर्यंत (csmt to kalyan) फेरीवाल्यांकडून (hawkers) जबरदस्ती पैसे उकळून कोट्यवधींची संपत्ती गोळा करणाऱ्या गुन्हेगाराच्या (criminal) रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वारंवार संघटित गुन्हेगारी करत असल्याने रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत संतोषकुमार सिंग (santoshkumar singh) उर्फ बबलू (43) यांच्यासह सात जणांना बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. सुरूवातीच्या काळात फेरीवाला असलेला संतोषकुमार सिंग सराईत गुन्हेगार बनल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी (railway police) दिली.
संतोषकुमार सिंग 2005 साली उत्तरप्रदेशमधून मुंबईत आला. सुरूवातीला दादर स्थानकावर ब्लेडची विक्री करायचा. त्यानंतर फेरीवाल्याचे काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हेगारांच्यासह राहण्यास सुरूवात केली. त्यानंतर खंडणी वसुल करण्यासाठी फेरीवाल्यांची संघटना तयार केली. यात त्याची पत्नी आणि इतर सहा जणांचा समावेश होता. कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या सर्व स्थानकावरील फेरीवालांना 'सुरक्षा' देण्याच्या नावाखाली, धमकावून खंडणी वसूल करण्याचे काम सुरू केले.
हा हप्ता साधारण 500 ते 5 हजार रुपयांपर्यंतचा असायचा. ज्या फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार दिला त्याला जीवे मारण्याची धमकी देत होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. बबलू संतोषकुमार सिंगने सुमारे 10 कोटींची संपत्ती गोळा केली. यात उत्तरप्रदेश येथे पाच एकर जमीन, मुंबईत सहा ठिकाणी घरे, दीड किलो सोने, फॉर्च्युनर आणि एक बरेलो गाडी, एक बुलेट बाईक, 8 ते 10 लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसी याशिवाय 30 वेगवेगळ्या बँक खात्यात 12 ते 13 लाख रुपयांची संपत्ती आहे. दबदाटी, खंडणी करण्यासाठी फाॅरच्यून गाडी वापरत असायचा, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
संतोषकुमार सिंगसह त्यांचे सात साथीदार सीएसएमटी, दादर, भायखळा आणि कुर्ला रेल्वे स्थानक, ठाणे शहर आणि कल्याण शहरामध्ये संतोषकुमार खंडणीचे रॅकेट चालवित होता. त्यांच्यावर अनेकवेळा गुन्हे दाखल होऊन जामिनावर सुटायचा. त्यानंतर ज्याने तक्रार केली आहे, त्यांना दमदाटी करून गुन्हा मागे घेण्यास लावायचा. त्याला दोन वेळा तडी केला होता. त्याला आठ महिने शिक्षा ही झाली होती. मात्र, त्यांच्या वर्तवणूकीत कोणतीही बदल झाला नाही. त्यामुळे त्याला कायमस्वरूपी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.