पुण्यानंतर कल्याणमध्येही तेच! भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण

Dombivli Crime: फोनव्दारे संपर्क करून काही गुंड मित्र बोलवून घेतले आणि कारमध्ये असलेल्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली.
पुण्यानंतर कल्याणमध्येही तेच! भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
Dombivli Crimesakal
Updated on

Pune Porshe Case In Kalyan: पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण चर्चेत असताना आता कल्याणमध्ये तशीच काहीशी पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने कार चालवताना दुसऱ्या चारचाकीला धडक दिली एवढेच नाही तर आपल्या मित्रांना बोलावून कारचालकाला बेदम मारहाण करत, गाडीची तोडफोड देखील केली आहे.

पुण्यानंतर कल्याणमध्येही तेच! भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
Kalyan Crime : आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सशी छेडछाड; अश्लील चाळे करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अल्पवयीन मुलाचे वडील हे भाजपचे पदाधिकारी असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलीस सुरवातीला विलंब करीत होते. यानंतर कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण अटाळी गावात शुक्रवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगा ब्रिझा कार घेऊन कल्याणवरून अटाळी येथे असलेल्या आपल्या घरी जात होता. अटाळी चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या किया कारला अल्पवयीन मुलाने धडक दिली. या धडकेनंतर वाद निर्माण झाला.

या वादात मुलाने कारचालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने फोनव्दारे संपर्क करून काही गुंड मित्र बोलवून घेतले. आणि किया कारमध्ये असलेल्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली.

पुण्यानंतर कल्याणमध्येही तेच! भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक घटना, भरधाव जीपच्या धडकेत दोन तरुणी गंभीर जखमी

धक्कादायक बाब म्हणजे ही घटना मध्यरात्री उशिरा घडली, मात्र कल्याण खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. तक्रारदार नसल्यामुळे गुन्हा दाखल केला नाही, असे सांगण्यात आले. या अपघाताची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवर स्वतः गुन्हा (सुओ मोटो) दाखल करून तपास सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलाचे वडील भाजपचे पदाधिकारी

या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी हे भाजपचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. राजाराम चौधरी यांनी पोलिसांवर राजकीय दबाब टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारदार नसल्याचे कारण देत गुन्हा दाखलच केला नाही. मात्र सोशल मीडियावर अपघाताची चर्चा रंगल्यावर पोलिस स्वतः तक्रारदार झाले आणि सुओमोटो गुन्हा दाखल केला.

पुण्यानंतर कल्याणमध्येही तेच! भाजप पदाधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाची मुजोरी, कारला धडक देत चालकाला बेदम मारहाण
Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक घटना, भरधाव जीपच्या धडकेत दोन तरुणी गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.