महाराष्ट्राच्या तरुणाला मायक्रोसॉफ्टचा MVP पुरस्कार; राज ठाकरेंना भेटणार

Kasam Shekh
Kasam Shekh
Updated on
Summary

आतापर्यंत MVP हा पुरस्कार जगभरातील फक्त १४२ व्यक्तींनाच देण्यात आला आहे.

मुंबई - मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीतर्फे देण्यात येणारा मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेश्नल इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पुरस्कार महाराष्ट्रातल्या (Maharashtra) कासम शेख यांना मिळाला आहे. कासम शेख हे कल्याण शहरातील असून असा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील (India) पाचवे आणि महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत. आतापर्यंत MVP हा पुरस्कार जगभरातील फक्त १४२ व्यक्तींनाच देण्यात आला आहे. आयटी क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो.

कल्याण शहरात राहणारे कासम शेख हे कॅपजेमिनी या कंपनीत काम करतात. त्यांच्या आयटी क्षेत्रातील कामाशिवाय कासम शेख हे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधीबाबत ते तरुणांना मार्गदर्शन करतात. पुरस्कार मिळाल्यानंतर कासम शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सोशल मीडियावरून होत आहे. कासम शेख हे राज ठाकरेंचे चाहते असून ते लवकरच राज ठाकरे यांची भेटही घेणार असल्याचं म्हटलं जातंय.

Kasam Shekh
मियाँ-नॉटी आणि अधिकारी, सलीम-जावेदची जुगलबंदी; मोहित कंबोज यांची टीका

आर्टीफिशियल इंटेलिजन्समधील (Artificial Intelligence) आणि त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड (cloud ) प्रोडक्ट असलेल्या AZURE टेक्नॉलॉजीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. अनेक तरुण या अनोख्या टेक्नॉलॉजीकडे आकर्षित होत आहेत. एमव्हीपी पुरस्कारामुळे इतर तरुणांनाही या क्षेत्राकडे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल. महाराष्ट्रातील तरुणाला असा प्रतिष्ठेचा अवार्ड मिळणे ही सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()