डोंबिवली : कल्याण (kalyan) ग्रामीणमधील दावडी येथे डीपी रस्त्यात येणाऱ्या एका बेकायदा इमारतीवर (illegal building) काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाने (kdmc) कारवाई केली. कारवाई न करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पैसे घेऊनही कारवाई केल्याचा आरोप मुन्ना सिंग (Munna singh) या विकासकाने केल्याने ही कारवाई वादात सापडली आहे. पालिका प्रशासनाने त्यानंतर त्या अधिकाऱ्यांची बदली केली. मात्र त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल करावा (police case) अशी मागणी विकासक सिंग यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB) धाव घेत केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा दावा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr vijay suryavanshi) यांनी केला आहे.
दावडी येथील डीपी सर्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. कारवाई झाल्यानंतर विकासक मुन्ना सिंग यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर पैसे घेऊनही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. अधिकारी दीपक शिंदे व उपयुक्त अनंत कदम यांच्यासोबत बैठक झाली असून त्यांनी आपल्याकडून कारवाई न करण्यासाठी पैसे उकळले, तसेच आयुक्तांच्या नावेही पैसे घेतले असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. बैठकीचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी व्हायरल केले आहे.
याप्रकरणाची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करावी व आयुक्तांचीही चौकशी होऊन तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करा अशी मागणी कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांनी केली आहे. विकासक सिंग यांनीही याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. या प्रकरणात आयुक्त स्वतः सामील असल्याने ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
"अनधिकृत बांधकाम मुन्ना सिंग यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अप्पर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गली. त्या समितीने सिंग यांना सुनावणी पाठवली असून 17 सप्टेंबर पर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. चौकशीत काही तथ्य आढळल्यास निश्चित दोषींवर कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामावर सुरू असलेली कारवाई शिथिल व्हावी म्हणून असे खोटेनाटे आरोप समाजकंटक करीत आहेत. मात्र पालिका प्रशासन कारवाई करणारच. आत्तापर्यंत 620 बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे."
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.