Kalyan Lok Sabha : आमदार पाटलांना आनंद परांजपे यांचा वाढदिवस चांगलाच लक्षात ; परांजपे यांचा वाढदिवस आणि कल्याण लोकसभेचा निकाल

कल्याण लोकसभेतील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक महायुतीचे उमेदवार खासदार शिंदे यांचा प्रचार करत आहेत. आजी माजी खासदार आणि आमदार यांना यादरम्यान 2014 च्या लोकसभेची आठवण येत आहे.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok Sabhasakal
Updated on

डोंबिवली : कल्याण लोकसभेतील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक महायुतीचे उमेदवार खासदार शिंदे यांचा प्रचार करत आहेत. आजी माजी खासदार आणि आमदार यांना यादरम्यान 2014 च्या लोकसभेची आठवण येत आहे. 16 मे हा दिवस शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण होत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांना आमदार राजू पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, वाढदिवस लक्षात कसा याचे कारण सांगितले. आणि ते कारण एकूण सगळ्यांनाच हसू फुटले.

कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढील 5 वर्षाच्या संकल्प पत्राचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, माजी खासदार आनंद परांजपे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार खासदार शिंदे यांच्या प्रचारासाठी एकेकाळी त्यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचे कट्टर विरोधक राजू पाटील व आनंद परांजपे हे सध्या शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून जंगजंग पछाडत आहेत. प्रचारात एकत्र फिरताना आम्हाला 2014 च्या लोकसभेची आठवण होत असल्याचे यापूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे. वेळ बदलत असतो. वेळेनुसार आपण चालत असतो. प्रचार यात्रेमध्ये आम्ही एकत्र असतो.

मी पहातो मी मध्ये, बाजूला राजू पाटील, आनंद परांजपे होते. या दोघांचे या मतदारसंघांमध्ये योगदान आहे. ते माझ्या प्रचारासाठी आले ते स्वतः त्या रथावरती असतात. आणि पूर्ण ग्राउंड लेव्हल वरती त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील ते स्वतः काम करत आहेत. 2014 ची आठवण येते. आमची चर्चा देखील होते. एक दुसऱ्यांच्या समोर आम्ही लढत होतो. आज 2024 ला काळ बदलला, वेळ बदलली आणि आम्ही एकत्र प्रचार करत आहोत असे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे.

Kalyan Lok Sabha
Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

गुरुवारी खासदार शिंदे यांच्या पुढील कामकाजाचा आढावा म्हणजेच जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी माजी खासदार परांजपे व आमदार राजू पाटील उपस्थित होते. परांजपे यांचा आज वाढदिवस असल्याने आमदार पाटील यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वाढदिवस लक्षात कसा राहिला हे सांगत पुन्हा एकदा 2014 ची निवडणूक आणि त्याचा निकाल याची आठवण करून दिली.

आमदार पाटील म्हणाले, वाढदिवस यासाठी लक्षात आहे की, 10 वर्षांपूर्वी 16 मे ला लोकसभेचा निकाल होता. आम्ही तिघे उमेदवार म्हणून उभे होतो तेव्हा. श्रीकांत शिंदे हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले. व पहिला पेढा मीच भरवला होता त्यावेळेस त्यांना. तो दिवस कायम लक्षात असून त्यादिवशी परांजपे यांचा वाढदिवस होता. 2014 च्या लोकसभा निवडणुक निकालाची आठवण आमदार राजू पाटील यांनी करून देताच खासदार डॉ. शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. व त्यांनी हसत हसतच माजी खासदार परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.