Kalyan Lok Sabha : राजकारणात कधी शत्रुत्व तर कधी मैत्री ; कल्याण लोकसभेतील हे शिलेदार निभावतात वेगवेगळ्या भूमिका

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार सुरू आहे. श्रीकांत यांचे या मतदारसंघातील कट्टर विरोधक मानले जाणारे, त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मनसेचे आमदार राजू पाटील व राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे हे सध्या श्रीकांत यांच्यासाठी झटून कामाला लागलेले दिसून येत आहेत.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok Sabhasakal
Updated on

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार सुरू आहे. श्रीकांत यांचे या मतदारसंघातील कट्टर विरोधक मानले जाणारे, त्यांच्या विरोधात उभे राहिलेले मनसेचे आमदार राजू पाटील व राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे हे सध्या श्रीकांत यांच्यासाठी झटून कामाला लागलेले दिसून येत आहेत. यामुळे राजकारणात कधी शत्रुत्व तर कधी मैत्री अशा भूमिका हे शिलेदार निभावताना दिसत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत यांच्या विरोधातील आपली भूमिका नरमाईची करत त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्ह्यातील नेते आनंद परांजपे मात्र महायुती उमेदवाराच्या प्रचारात कुठे दिसत नसल्याने ते महायुतीच्या उमेदवारास मदत करणार की नाही ? याविषयीच्या उलट सुलट चर्चा रंगत होत्या. मात्र कळवा व अंबरनाथ येथील महायुतीच्या मेळाव्यात परांजपे दिसेल व त्यांनी देखील उमेदवार श्रीकांत यांचा प्रचार करत नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले गेले.

बारामतीत दगाफटका झाला, तर कल्याणमध्ये डॅमेज करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी. अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निकाल लागेल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपेंनी आपल्या पक्षासाठी किल्ला लढवला होता. शिवतारेंना थेट अंगावर घेणारे परांजपे मात्र ठाणे पट्ट्यातून गायब झाले होते. ते सध्या महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याची चर्चा होती. त्यामुळे आनंद परांजपे रुसल्याची चर्चा जोर धरु लागली होती. मात्र शनिवारी कळवा येथे झालेल्या व रविवारी अंबरनाथ येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात आनंद परांजपे दिसून आल्याने या चर्चा काहीशा थंडावल्या.

Kalyan Lok Sabha
Loksabha Election 2024 : जाहीरनाम्यात कामगार हक्क दुर्लक्षित ; नाममात्र पक्ष वगळता ठोस भूमिका नाही

डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमात आनंद परांजपेंच्या नावाचा उल्लेख तीनदा करण्यात आला. मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रिण करण्यात आलं, त्यावेळी परांजपे यांच्या नावाचा उल्लेख झाला. पण परांजपे तिथे उपस्थित नव्हते. ते बारामतीत सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते असे पक्षातील पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते.

एकेकाळी लोकसभा निवडणुकीत एकमेकां विरोधात लढलेले श्रीकांत शिंदे, आनंद परांजपे आणि राजू पाटील आता मात्र महायुती म्हणून एकत्र आले असून त्यांच्यात दिलजमाई झाल्याचे बोलले जात आहे. आमदार पाटील यांनी झाले गेले विसरून जाऊ राजकारणाचा तो एक भाग असतो असे म्हणत आपली नाराजी नसल्याचे सांगितले होते. आता परांजपे देखील श्रीकांत यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे राजकारणा कोण कोणाचा दुश्मन आणि कोण कोणाचा मित्र कायम नसतो हे अधोरेखित होते. दरम्यान येणाऱ्या विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकीत हे नेते पुन्हा एकत्र दिसतील का ? पक्षाची भूमिका म्हणून हे एकत्र आलेत की खरेच त्यांचे मनोमिलन झाले आहे हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.