Kalyan Dombivli Election : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणूक जवळ येऊ लागली आहॆ, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत हे उमेदवार असून येथे शिंदे व ठाकरे गटात लढत होत आहे. तर भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे हे उभे असून तेथे तिहेरी लढत होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र व केंद्रीय राज्यमंत्री पाटील हे दोघेही आपली हॅट्रिकसाठी झटत असून या मतदारसंघाना महत्व आले आहे. महायुती व महाविकास आघाडीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बडे नेते या उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी पुढील आठवड्यात कल्याण डोंबिवलीत असून निवडणूकीचे रणांगण दणाणून सोडणार आहेत. (Election Rally in Kalyan-Dombivli)
ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी ददिग्गज नेते मंडळी पुढील आठवड्यात कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत.
येत्या 12 मे , 13 मे आणि 15 मे रोजी दोन्ही लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत.
महायुतीला पाठिंबा दि्ल्यापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. कल्याण लोकसभेत एक सभा घेण्याचे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांच्या मागणीवरून राज ठाकरे यांनी दिले असून येत्या 12 मे रोजी डोंबिवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा घेणार आहेत, या सभेला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थिती राहू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
तर 13 मे रोजी डोंबिवलीत सावळाराम क्रीडा संकुल मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी सांगितले.दुसरीकडे 12 मे रोजी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र (बाळया मामा) म्हात्रे प्रचारार्थ शरद पवार हे स्वतः सभा शहापूर आणि कल्याणमध्ये घेणार आहेत.
दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपील पाटील यांच्या विरुध्द राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे, नीलेश सांबरे यांच्या बरोबर लढत होणार आहे. हा गड सहजासहजी राखणे भाजपला यावेळी जड जात असल्याने अखरेच्या टप्प्यात मोदी पंतप्रधान येत्या 15 तारखेला कल्याण पश्चिमेत सभा घेणार आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय घमासान पहायला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.