Kalyan Loksabha: ठाणे पाठोपाठ कल्याण लोकसभा जागेवर भाजपा दावा करत असून या मुद्द्यावरून भाजप व शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. (kalyan loksaha eletion)
आताही भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी कल्याणच्या दाव्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याणची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. (maharashtra politcal news)
यासंबंधी एक बैठक देखील कल्याण पूर्वेत पार पडली आहे. यामुळे महायुतील हा वाद पुन्हा एकदा समोर आला असून, आता कल्याणच्या दाव्यावरुन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ताप वाढला असल्याचे बोलले जात आहे. (bjp vs shivsena in kalyan )
शिवसेना शिंदे गटाने ठाणे व कल्याणसाठी आपली ताकद लावली आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत कल्याणची जागा शिवसेनेला सोडायची नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिक भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. (kalyan loksabha)
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली. जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली.
भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील भाजच्या कार्यकत्यांनी संमत केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.
कल्याण लोकसभेची जागा भाजपाला मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर महायुतीचे काम करणार नाही, असेही वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे.
अशा मागणीचं सह्या केलेले एक निवेदनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे यांना सादर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम ठेवली आहे, असे चित्र दिसून येत आहे.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली. जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील भाजच्या कार्यकत्यांनी संमत केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.(shinde vs bjp)
कल्याण लोकसभेची जागा भाजपाला मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप नेते व पदाधिकारी वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर ही जागा भाजपला मिळाली नाही तर महायुतीचे काम करणार नाही, असेही वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे. अशा मागणीचं सह्या केलेले एक निवेदनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे यांना सादर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी कायम ठेवली आहे, असे चित्र दिसून येत आहे.
कल्याण लोकसभेची जागा भाजपला मिळावी या करता कल्याण पूर्वेत ही भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांची निर्णय आणि चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. याआधी शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो बॅनर न लावण्याचा निर्णय कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी यांनी घेतला होता. पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे.
आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील .आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल असं अशा भ्रमात त्यांनी राहू नये ,श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकतं.
युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे .
कल्याण पूर्वक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचे बैठक झाली या बैठके भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अन्यथा काम करणार नाही असा इशारा दिला होता या बैठकीतला शिवसेना शिंदे गटाने प्रतिउत्तर दिलंय .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.