कल्याण - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाशी जवळीक असूनही यंदाही टीम ओमी कलानी श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारात उतरणार आहे. कलानीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांनी कलानी टीमचे आभार मानले.
यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ओमी कलाने दोस्ती दुनियेतील राजा आहे असे म्हणत खासदार शिंदे यांनी कलानी यांचे कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संपूर्ण मतदारसंघ प्रचार करताना पिंजून काढत आहेत. या भेटीगाठींमध्ये कलानी गटाचे पदाधिकारीही हजेरी लावत आहेत. तर कलानी गटाने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दोन कार्यकर्ते मेळावे आयोजित केले होते.
मंगळवारी कलानी महलात पुन्हा टीम ओमी कलानींच्या वतीने आयोजीत संघटना बैठकीला श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांनी कलानी टीमचे आभार मानले.
टीम ओमी कलानी कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार शिंदे यांनी टीम ओमी कलानीचे आभार व्यक्त केले आहे. ओमी कलानी आणि शिवसेनेची मैत्री फार जुनी असून यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला बिनशर्तपणे मोठी मदत केल्याचे याप्रसंगी आवर्जून सांगितले.
टीम ओमी कलानीची उल्हासनगरमध्ये वेगळी ताकद असून ओमी कलानी एक उत्तम मित्र असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले. ओमी कलानी हा दोस्ती दुनियेतील राजा आहे. तसेच उल्हासनगर शहरासाठी महायुती सरकारने आजवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण आणि रखडलेला पुनर्विकास यासाठी सरकारने नियमांमध्ये बदल करून विशेष धोरण आणले.
क्लस्टर योजना उल्हासनगरला लागू झाली. शहरात कॅशलेस हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल, चांगले रस्ते, ट्रान्झिट कॅम्प अशा अनेक सुविधा पुरवल्या असून भविष्यात शाळा, कॉलेज, उद्याने, अंडरग्राउंड पार्किंग अशा सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
तसेच त्यांनी टी.ओ.के प्रमुख ओमी कलानी यांच्या उल्हासनगर कँप नंबर २ येथील गोलमैदान परिसरात असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. अलायन्स मधील हे पहिले कार्यालय सुरू झाले असून येणाऱ्या काळात अनेक शिवसेनेच्या कार्यालयांचे उद्घाटन होणार असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. यावेळी ओमी कलानी, पंचम कलानी, कमलेश निकम, मनोज लासी, पंकज त्रिलोकांनी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.