Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
sakal
Updated on

Kalyan loksabha: कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी त्यातील डोंबिवली विधानसभा क्षेत्रात भाजपची मक्तेदारी राहिली आहे. या मतदारसंघात भाजपची साथ अन् मतदारांचा कौल हा शिवसेना खासदाराच्या विजयासाठी निर्णायक मानला जातो.

आतापर्यंत भाजप शिवसेनेला येथे साथ देत आला आहे; मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात असलेल्या नाराजीमुळे या मतदारसंघातील मते महायुती उमेदवाराच्या पारड्यात पडणार की या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीच्या स्थानिक उमेदवार वैशाली दरेकर यांना मिळणार हे पाहावे लागणार आहे.

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
Dombivli : वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्यच; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

कल्याण लोकसभेत चार विधानसभा मतदारसंघ येतात. भाजपचे दोन आमदार या मतदारसंघात आहेत. २००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. जनसंघापासून डोंबिवली विधानसभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विचारसरणीचा प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.(Dombivli became an independent constituency)

मतदारसंघात गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होत आले आहे. केंद्रात असलेल्या भाजपच्या सत्तेकडे पाहूनच येथील मतदार विधानसभेसाठीदेखील भाजपला मतदान करत असल्याचे पाहायला मिळते. तसेच मराठी टक्कादेखील येथे जास्त असला तरी कोकणवासी चाकरमान्यांची संख्या त्यात अधिक आहे. त्यांचा कलदेखील भाजपकडे राहिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून एका ठराविक विचारसरणीतून येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले आहे. त्याचा फायदा हा शिवसेनेच्या खासदारांना झाला आहे; परंतु यंदा येथील परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत फूट पडली असून भाजप व शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर आहे. डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावरील आरोपामुळे खासदार शिंदे यांच्याविरोधात भाजपने उघड नाराजी दर्शविली होती.

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
Dombivli News : गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल 1 एप्रिल पासून बंद; पूल धोकादायक असल्याने बंदचा निर्णय

आजही भाजप पदाधिकारी शिवसेनेला मदत न करण्याच्या भूमिकेत असून वरिष्ठ त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत; मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचे असल्याने तसेच वरिष्ठांनी शिवसेनेलाच येथून तिकीट दिल्याने त्याचा फायदा खासदार शिंदेंनाच होणार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी येथे भाजपचे मंत्री चव्हाण यांची असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. एक राजकीय गुपित या दोघांनी पाळले असून लोकसभेत शिवसेनेला मदत तर विधासभेत भाजपला मदत असे समीकरण येथे जुळले आहे. यामुळे शिवसेनेचे शिंदे यांच्या पारड्यात मतांचा कौल पडू शकतो.

सेनेत फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देत डोंबिवलीच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली या मूळच्या शिवसैनिक असून राज ठाकरे यांची साथ धरत त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला होता.(shivsena ubt)

मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मनसेत असताना त्यांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणूकदेखील लढवली होती. भाजपची नाराजी, स्थानिक उमेदवाराला दिलेली संधी, महिला उमेदवार तसेच शिवसेना शिंदे गटाविषयी असलेल्या नाराजीचा फायदा दरेकर यांना मिळू शकतो.(shivsena shinde )

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
Dombivli News : अखेर 14 गावांचा अंतिम निकाल लागला; 14 गावे नवी मुंबई महापालिकेत दाखल

डोंबिवली मतदारसंघात २०१९च्या मतदार गणनेनुसार तीन लाख ३८ हजार ३३० मतदार आहेत. त्यात पुरुष एक लाख ७४ हजार व महिला मतदार एक लाख ६३ हजार आहेत.

या मतदारसंघात भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. १२ हजार ३२७ मतांनी आघाडी घेत ६१ हजार मते मिळवित ते विजयी झाले. तर मनसेच्या राजेश कदम यांना ४८ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये शिवसेना व भाजप वेगवेगळे निवडणूक लढले. यात २०१४ मध्ये शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचा पराभव करत भाजपच्या चव्हाण यांनी ४६ हजार २२५ मतांची आघाडी घेत दुसऱ्यांदा विजय मिळविला होता.

त्यावेळी चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती, तर दीपेश म्हात्रे यांना ३७ हजार ६७४ मते मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मनसेच्या हरिश्चंद्र पाटील यांना ११ हजार ९७८ मते मिळाली होती. २०१९ मध्ये पुन्हा शिवसेना भाजपने युतीत निवडणूक लढवली. यावेळी भाजपचे चव्हाण यांनी ४१ हजार ३११ मतांची आघाडी घेत मनसेच्या मंदार हळबे यांचा पराभव करत विजयाची हॅट्‌ट्रीक केली. चव्हाण यांना ८६ हजार २२७ मते मिळाली तर मनसेच्या मंदार हळबेंना ४४ हजार ९१६ मते मिळाली होती.

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
Dombivli Traffic: डोंबिवलीमध्ये वाढला कर्णकर्कश सायलेन्सरचा दणदणाट, कोण कारवाई करणार ? नागरिकांचा सवाल

एकगठ्ठा मते विखुरणार : डोंबिवलीत मतदारसंघात २०१९ लोकसभेच्या निवडणुकीत युतीच्या पारड्यात एक लाख ४३ हजार मते पडली होती. तर आघाडीला अवघी १९ हजार मते मिळाली होती. जवळपास दीड लाखाची ही एकगठ्ठा मते यावेळी विभागण्याची शक्यता आहे. संघाची किंवा भाजपची मते ठाकरे गटाला मिळणार नाहीत; पण ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या झोळीतही किती पडतील, याविषयी शंका आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे शिवसेनेची मते ही विभागणार आहेत.तसेच रस्त्यांच्या कामांसाठी करोडोने निधी या मतदारसंघात आला असला तरी इतर विकासकामांची मात्र वानवा दिसून येते.

स्थानिक मुद्दे व समस्या

ठाकुर्ली उड्डाणपुलाचे वर्षानुवर्षे रखडलेले काम.

डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे

जुन्या इमारती पुनर्विकासचे धोरण नाही

डोंबिवली पूर्वेत शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

डोंबिवली लोकलची संख्या वाढवावी, ही मागणी करूनही त्याचा विचार नाही

मतदारसंघातील विकासकामे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने माणकोली उड्डाणपूल पूर्ण(do shrikant shidne)

शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

Dombivli Potilics: एकेकाळी मराठी बहुल असणारा मतदार संघात आता इतर भाषीकांचा बोलबाला, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा
Dombivli Crime : डोंबिवलीत केडीएमसीच्या लाचखोर निवृत्त कर्मचाऱ्यासह शिपाई रंगेहाथ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.