अडीच वर्षे फरार आरोपी गजाआड; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

kalyan CID
kalyan CIDsakal media
Updated on

डोंबिवली : कल्याण (kalyan) शिळफाटा रोडवरील गोदामाचे शटर उचकटून लॉकर मधील 8 लाख 43 रोख रक्कम चोरट्यानी (money robbery) नोव्हेंबर 2018 मध्ये चोरून नेली होती. या चोरीतील मुख्य आरोपी (culprit) आकाश उर्फ बटल्या सिंग (वय 21) याला अडीच वर्षानंतर पकडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) यश आले आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात (kalyan court) त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी (arrest) सुनावण्यात आली आहे. आकाशवर यापूर्वी दोन पोलीस ठाण्यात प्रत्येकी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

kalyan CID
कल्याण: आर्चीस सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने दोघे जखमी

कल्याण शिळफाटा रोडवरील रिअल वाईन्स शेजारी असलेले डी. एस. ऐजन्सी हे गोदाम नोव्हेंबर 2018 मध्ये चोरट्यानी फोडले होते. गोदामाचा लोखंडी शटरचा पत्रा वाकवून त्यावाटे गोदामात प्रवेश करून 8 लाख 43 हजार 900 रुपये रोख रक्कम असलेला लॉकर घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जानेवारी 2019 मध्ये या चोरीतील एकूण 6 जणांना यात अटक केली होती. व त्यांच्याकडून 5 लाख 45 हजाराचा माल हस्तगत करण्यात आला होता. तेव्हापासून यातील मुख्य फरार आरोपी आकाशचा मानपाडा पोलिस शोध घेत होते. बदलापूर पूर्वेला राहणार आकाश सतत राहण्याचे ठिकाण बदलून गेले अडीच वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे याचा तपास जाताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांच्या पथकाने आकाशचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून माहिती घेत गुप्त बतमीदारांमार्फत आकाशचा ठिकाणा शोधून काढला. बदलापूर येथेच आकाश असल्याचे समजताच सापळा रचुन बुधवारी 25 ऑगस्टला ताब्यात घेतले. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कळमकर करीत आहेत. आकाश हा सराईत गुन्हेगार असून तपासात त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 3 असे 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.