Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर थेट निशाणा
Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
sakal
Updated on

Kalyan News: मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाची एसआयटी चौकशी लावण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून होत आहे.

याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. एसआयटी चौकशीचे जे काही नाटक काल पासून सुरु आहे.

तर फडणवीस यांनी कही पे निगाहे कही पे निशाणा करु नये. फडणवीस यांचा निशाणा जर थेट शिंदे यांच्यावर असेल तर त्यांनी तसेच सभागृहात थेट बोलावे.

आडून आडून शरद पवार, उद्धव ठाकरे व राजेश टोपे अशी नावे न घेता थेट बोलावे असे म्हणत अंधारे यांनी फडणवीस यांना लक्ष केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात बुधवारी सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (devendra fadanvis shushma andhare)

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Shivsena-MNS मध्ये Kalyan Loksabha मतदारसंघात मनोमिलन? Dr. Shrikant Shinde, Raju Patil एका मंचावर

मातृत्व ते शिवतीर्थ मुक्त संवादाचा आजचा 23 वा दिवस असून कल्याण लोकसभेत आज आम्ही पोहोचलो आहोत. मातोश्रीवर या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती उपनेत्या अंधारे यांनी कल्याण येथे पत्रकारांना सांगत पुढील संवाद सुरु केला.

त्या म्हणाल्या, आज कल्याण उद्या ठाणे आणि पुढे धारावी येथे सभा होणार आहेत. अंबानीच्या खिशात सर्व घालायचं असेल तर तिथल्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भाने तिथल्या तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी जाणार आहे. (kalyan politcs )

मी महिला असून काल एक महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रात घडली आहे. वायकर हे भाजपमध्ये गेले नाही तर कारवाई करू जेलमध्ये टाकू अशा प्रकारचा भाषा सुरू आहे ते भाजप सोबत गेले तर त्यांच्या वरच्या सर्व कारवाया काढून टाकल्या जातील सगळीकडून क्लीन चीट दिले जाईल. लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला असून ते जाहीरपणे बोलून दाखवतात हे खूप वाईट आहे असे त्या म्हणाल्या.

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan Loksabha: कल्याण लोकसभेवर सर्वच पक्षांचं लक्ष; शिवसेना, भाजप, मनसे, उबाठा लागले कामाला

यासोबतच त्यांनी कल्याण पूर्वचे आत्ताच वातावरण पाहिले तर कमालीची गुन्हेगारी, दहशत, अस्थिरता आणि लोकांची नाराजी आहे जी सातत्याने लोकांना भेटताना दिसते. त्यावर आम्ही मुक्त संवाद साधणार आहोत. कल्याण मधील गुन्हेगारी आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. काल परवा पर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता.

पण आत्ता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जनस्थळी किंंवा अंधारात नाही तर भरदिवसा पोलिस ठाण्यात गोळीबार करत आहेत. गोळीबार करणारा, ज्याला गोळी लागते तोही हे दोघे ही सरकार पक्षातले आहेत. याचा अर्थ फडणवीस आणि शिंदे यांच्यातील धुसफुस गॅंगवॉरच स्वरूप घेत आहे.(shrikant shidne)

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक

एसआयटी चौकशी करायची तर...

याकडे लक्ष देण्याऐवजी जरांगे यांच्यासंबंधी सभागृहात काही गोष्टी मांडल्या गेल्या. जरांगे यांची एसआयटी चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी. पण त्यांची एसआयटी चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षण आणि ओबीसी, एसटी या आरक्षण लढ्यात निव्वळ सरकारने लावलेल्या कुस्तीमुळे जे तीन चारशे लोक मेले त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? याकडे आम्हाला सरकारचे लक्ष वेधायचे आहे.

सरकारला जर ऐवढी एसआयटी चौकशी लावण्याची हौस असेल तर भिमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीच काय झाल ? यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे. या सगळ्या संबंधाने आतापर्यंत ज्या अनेक अफरा तफरी झाल्या त्यात अनेक लोकांचे जीव गेले. त्याच्या चौकशीचे काय ? समृद्धी महामार्गावर अपघातात 28 ते 30 लोक गेले या सगळ्या अपघातांची चौकशी सरकार लावणार का ?(ekanth shidne )

एसआयटी चौकशी लावण्याचे जे काही नाटक सरकारकडून काल पासून सुरु आहे. कोण आहे तो म्हस्के नावाचा कोण तरी त्यावर वेगवेगळी वक्तव्य केली जाते आहेत. ठाण्यात उद्या त्यावर आम्ही बोलूच असे म्हणत त्यांनी ठाण्यातील शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना देखील एक प्रकारे आव्हान दिले आहे.

पुढे त्या म्हणाल्या उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कही पे निगाहें कही पे निशाणा करु नये. त्यांचा निशाणा थेट जर शिंदे यांच्यावर असेल तर तसे त्यांनी थेट सभागृहात बोलावे. आडून आडून राजेश टोपे, पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे अशी नावे न घेता थेट निशाणा साधावा थेट बोलावे कारण जर काही आक्षेप असतील तर सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे यांचा वावर देखील फार महत्वाचा होता. त्यामुळे त्यांनी थेट निशाणा साधावा असे त्या म्हणाल्या.

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan News: शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती!

श्रीकांत यांच्यासाठी ही निवडणूक सोप्पी नाही

कल्याण लोकसभेत ठाकरे गटाकडून अंधारे यांचे नाव चर्चेत आहे, याविषयी त्या म्हणाल्या, माझ नाव चर्चेत पण मला अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. मुक्त संवाद अभियानाच्या माध्यमातून मी या रुटने आले आहे. माझ्या पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल. तुम्हाला असे का वाटते की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे.

हा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तो अडचणींचा डोंगर आहे. परंतू आम्हाला ते फार मोठे आव्हान वाटत नाहीत. कल्याण मधील वाढती गुन्हेगारी, अस्वस्थता, ठेकेदार, पोलिस यंत्रणा दहशतीखाली आहे. येथे सत्ताधाऱ्यां मधील गॅंगवॉर शिगेला पोहोचला आहे. तर मला असे निश्चित वाटते की येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोप्पी असणार नाही. जितकी सोप्पी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे. कारण मुख्यमंत्री स्वतःच प्रोजक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले, तरी श्रीकांत यांचे प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करु शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे.(shinde vs thackeray)

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan News: शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती!

निष्ठावंतांना घाबरविण्यासाठी गृहखात्याचा वापर

मलंगगड येथे निष्ठेचा प्रसाद वाटल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी बोलताना अंधारे म्हणाल्या, निष्ठेचा प्रसाद हा शब्द काही आक्षेपार्ह वाटत नाही. हा शब्द वापरल्यामुळे कायद्यानुसार गुन्ह्याचे डेफिनेशन त्याच्यावर असू शकते. फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी कायद्याचा जो गैरवापर सुरु आहे. जर गैरवापर करायचाच असेल आणि आक्षेपार्ह काही वक्तव्य असतील तर आपण विचार केला पाहीजे की या सगळ्याच्या मध्ये नितेश राणे यांनी जे स्टेटमेंट केल होत.

तो गुन्हा आहे, त्यानुसार 353 दाखल व्हायला हवी. पोलिस तत्पर असते, गृहखात स्वायत्त आणि स्वतंत्रपणे काम करत असते तर राणे यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल झाली असती. परंतू पोलिस यंत्रणा ज्या गृह खात्याच्या अधीन आहे त्या गृहखात्याचे गृहमंत्री स्वतः फडणवीस यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे त्यांचे खच्चीकरण करणे यासाठीच गृहखात्याचा वापर करावा वाटतो. आमची देवेंद्र भाऊंना विनंती असेल याने काहीच फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरी शिवसेना, ठाकरे मातोश्री हे समीकरण एवढे घट्ट आहे की आम्ही सगळे ठामपणे त्यासोबत उभे आहोत.(maharashtra News)

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan Politics: ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत - दीपेश म्हात्रे

कोट कोठे विकायचे अॅमेझॉन की नेटफ्लिक्सवर

हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या मार्गावर आहेत याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, हेमंत गोडसेच का खूप जण संपर्कात आहेत. त्यांना मंत्रीपद देतो सांगून सोबत घेऊन गेले. आमचेच भरत दादा आहेत. भरत दादांनी शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता अॅमेझॉन वर विकायचा की नेटफ्लिक्सवर विकायचा अशी स्थिती आहे.

त्यामुळे असे अनेक लोक आहेत, त्यांना मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेले. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्यांना हेही माहित आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत.

आमचा नेता आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे उद्धव यांना वाटते असे अमित शहा यांनी म्हटले आहे, यावर त्या म्हणाल्या, अतिगर्भ श्रीमंत मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आपल्या मुलाला दोन वेळा खासदार करावेसे वाटते तर काय हरकत आहे,

ज्यांच्या बापजाद्यांनी हा महाराष्ट्र वाढविण्यासाठी रक्ताच पाणी केल. आणि या महाराष्ट्राची सत्ता, अस्मिता अबाधित राहण्यासाठी आपल्या पिढ्या येथे घालवल्या त्यांच्या पोराला मुख्यमंत्री करणे हे ठाकरे यांची नाही तर आम्हा तमाम शिवसैनिकांची मनिषा आहे. आम्हाला वाटत होय आमचा नेता आदित्य ठाकरे आहेत.(Mumbai News)

Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये
Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.