Kalyan News: देसलेपाडा ते भोपर रस्त्याचे काम आचार संहितेच्या आधी तरी काम सुरू होईल का ?

मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
raju patil and ravidnra patil
raju patil and ravidnra patil sakal
Updated on

Raju Patil MNS: कल्याण डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामांना जोर आला आहे. मात्र कल्याण ग्रामीण भागातील देसले पाडा ते भोपर या रस्त्याच्या कामाचा नारळ अजून काही फुटलेला नाही.

यावरून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नुकतेच एक ट्विट केले असून ते आता चर्चेत आले आहे. वर्षभरापूर्वी मंजुरी मिळाली, तीन महिने झाले वर्क ऑर्डर निघाली...आचारसंहिते पूर्वी हे काम सुरू होईल का ? असा सवाल त्यांनी सत्ताधारी सरकारला विचारला आहे.

raju patil and ravidnra patil
Kalyan News: फडणवीसांनी थेट शिंदेवर निशाणा साधावा; आडून आडून बोलू नये

कल्याण डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था असून खड्ड्यांनी त्यांची चाळण झालेली आहे. रस्त्यांची दुरावस्था पाहता शासनाने सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर भर दिला. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून भरघोस निधी प्राप्त करून या रस्त्यांच्या कामास सुरुवात देखील झाली आहे.()kalyan dombivli News)

बहुतांश ठिकाणी काम पूर्णत्वास आलेली असून उर्वरित कामे सुरू असल्याचे चित्र शहरात दिसते. अनेक ठिकाणी संथ गतीने सुरू असलेल्या या कामांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीसा जोर धरला आहे. शहरी भागात ही कामे जोरात सुरू असताना ग्रामीण भागात मात्र अनेक रस्ते आजही कामाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी अद्याप कामच सुरू झालेली नाहीत.(kalyan mns)

या कामांना वर्क ऑर्डर मिळून देखील कामास सुरवात होत नसल्याने यात नेमके कोण आडकाठी करत आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विट मुळे हा प्रश्न चर्चेत आला आहे.(mns news)

raju patil and ravidnra patil
Shivsena-MNS मध्ये Kalyan Loksabha मतदारसंघात मनोमिलन? Dr. Shrikant Shinde, Raju Patil एका मंचावर

काय आहे ट्विट

देसलेपाडा ते भोपर रस्त्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याला एक वर्ष झाले. सदर कामांची वर्क ॲार्डर काढून जवळजवळ साडेतीन महिने होऊन सुद्धा काम सुरू केले नाही. लवकरच आचारसंहिता लागू होईल त्याआधी हे काम सुरू होईल का ?

असा सवाल ट्विट मध्ये उपस्थित करत आमदार पाटील यांनी हे ट्विट, कामाची मंजुरी व वर्क ऑर्डर अशा सर्व गोष्टी मंत्री चव्हाण यांना टॅग केल्या आहेत.(maharashtra politics)

raju patil and ravidnra patil
Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक

यासोबतच त्यांनी गेल्या वर्षी रस्त्यांच्या 30 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल मंत्री चव्हाण यांचे आभार मानणारे ट्विट देखील रिट्विट केले आहे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 - 24 मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 1) मानपाडा रोड ते देसलेपाडा-भोपर मुख्य रस्त्याचे कॉंक्रिटीकरण - रु. 20 कोटी. 2) कल्याण-शीळ रस्त्यावरील जंक्शन सुधारणा व सुशोभिकरणासाठी - रु. 4 कोटी, 3) टाटा पॉवर-बंदिश पॅलेस रस्ता - 6 कोटी अशी एकूण 30 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिल्याबद्द्ल सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे धन्यवाद

raju patil and ravidnra patil
Kalyan News: राममंदिराच्या लोकार्पणाचा विजय साजरा करत असताना दुचाकीवर दगडफेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.