Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक

केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आणि शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची जाहीर सभा
Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक
Updated on

Kalyan News: कल्याण तालुक्यातील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची एका बांधकाम व्यवसायिकांने फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकत घेऊन त्यांचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहे. (kalyan political News)

Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक
Explosives Found at Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके!

कल्याण तालुक्यातील वडवली गावात बुधवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

वडवली कोळीवाडा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जाहीर सभा गावात भरविण्यात आली होती. या सभेला केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(farmers News kalyan)

Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक
Kalyan Politics: आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड!

बांधकाम व्यवसायिकांने येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्याची पूर्तता केली गेली नाही. त्यामुळे इथला शेतकरी भूमीहीन झालाय.

गेलेली जमीन आणि त्याचा मोबदला परत मिळावा यासाठी हे शेतकरी लढा देत आहेत .यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी वडवली गावात जाहीर सभेचे आयोजन केले होते.

दरम्यान या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेना आमदारांनी दिली आहे. आमदार भोईर म्हणाले, 2007 ते 2010 या कालावधी मध्ये बांधकाम व्यवसायिकांनी जागा डेव्हलप साठी घेतल्या होत्या. एक दोन बिल्डिंग सोडल्या तर कोणतेही बांधकाम या गावात झालेले नाही सर्व जागा पडीक पडून आहेत.

Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक
Kalyan News: शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती!

घरात काही अडचणी असतील तर शेतकरी आपली जागा विकतात परंतु त्यांची जर ती पूर्तता झाली नाही तर ते आक्रोश करणारच.

येथील शेतकरी संघटना त्यासाठी लढा देत आहेत तहसीलदार कार्यालयावर त्यांचे आंदोलन देखील झाले होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री कपिल पाटील देखील आज येथे आले होते. आम्ही सर्व या गावकऱ्यांच्या पाठीशी असून. शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले.

येत्या काळात जर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

Kalyan News: कल्याण तालुक्यातील 300 हून आधीक शेतकऱ्यांची फसवणूक
Kalyan Khadakpada: नवरा शारीरिक सुख देत नाही म्हणून ३२ वर्षीय पत्नीची पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.