डोंबिवली, ता. 29 - लोकसभा निवडणुकीची परतफेड म्हणून महायुतीकडून कल्याण ग्रामीण मध्ये उमेदवार दिला जाणार नाही अशी चर्चा गेल्या अनेक दिवस येथे रंगली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने येथे उमेदवार दिला असून आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. येथे कोणी जागा सोडावी अशी अपेक्षा केली नव्हती अशी स्पष्ट कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजीव पाटील यांनी दिली आहे.
दिवाळीनिमित्त डोंबिवलीतील फडके रोडवर मनसेच्या वतीने रोषणाई करण्यात आली आहे. या दीपोत्सवाचे उद्घाटन मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील स्पष्टोक्ती दिली आहे.