डोंबिवली : पोर्तुगाल येथील महिलेचा विनयभंग करणारा तीन वर्षानंतर गजाआड

कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक
Culprit arrested
Culprit arrestedsakal media
Updated on

डोंबिवली : पोर्तुगाल येथील रहिवासी (Portugal woman) असलेली एक महिला 2019 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. 14 फेब्रुवारीला गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून (Nizamuddin express) प्रवास करीत असताना एका व्यक्तीने तिच्यासोबत कल्याण कसारा दरम्यान विनयभंग केला होता. भारतीय दूतावासाला (Indian Embassy) याची माहिती या महिलेने दिल्यानंतर भारतीय दूतावासाने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. अनेक प्रक्रीया पार पडल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिस (Kalyan railway Police) ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. महिलेने सांगितलेल्या वर्णनावरुन सोशल मीडियाचा आधार घेत पोलिसांनी तब्बल तीन वर्षानंतर आरोपीला अटक (culprit arrested) केली आहे. साहिश असे आरोपीचे नाव असून तो भारतीय सैन्य विभागात कामाला असल्याची माहिती कल्याण जीआरपी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली आहे.

Culprit arrested
कासा बाजारपेठेत भुरट्या चोराचा सुळसुळाट; किमती कपडे व रोख रक्कम घेवून पाबोरा

पोर्तुगाल येथील एक महिला भारतात फिरण्यासाठी तीन वर्षापूर्वी आली होती. निजामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करीत असताना कल्याण ते कसारा दरम्यान 14 फेब्रुवारी 2019 ला रात्री 11 ते 11.30 च्या दरम्यान एका व्यक्तीने तिच्या पायाला स्पर्श करीत विनयभंग केला होता. याविषयीची तक्रार महिलेने भारतीय दूतावासाकडे केली होती. भारतीय दूतावासाकडून रेल्वे पोलिसांना व कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात ही तक्रार प्राप्त झाली. तक्रार दाखल झाल्यानंतर कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने तातडीने तपास सुरु केला.

महिलेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी विविध माध्यमातून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार भारतीय सैन्य दलात आरोपी कामाला असून त्याने नाव व मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. त्यानंतर सोशल मिडीयाचा वापर करुन त्याची ओळख पटविली गेली. पोलिस आपला शोध घेत असल्याची कुणकुण लागताच साहीशने कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने नामंजुर केला होता. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली तेथेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेला. याच दरम्यान साहिश हा कल्याण येथील नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी तेथून साहिशला अटक केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()