डोंबिवली - मागच्या वेळेस विधानसभेला कल्याण ग्रामीणमध्ये आपण गाफील राहिलो. ती चूक यावेळी करू नका. असे सांगत सभा मोठी आहे, म्हणून बेसावध राहू नका. जोमाने काम करून समोरच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, या दृष्टीने विकासासाठी काम करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मध्ये मतदारांना आवाहन केले.