डोंबिवली - महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारा मी माणूस आहे. येथील नागरिकांना सुखी समाधानाचे जीवन जगता येईल याचा मी विचार करतो. तो माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो काही खुर्चीचा प्रश्न नाही, किंवा मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडावी यासाठी नाही. आत्ता जे राजकारण सुरू आहे ती शिवी वाटते मला. जे बेढब चित्र दिसत आहे राज्यात ते अत्यंत लाजिरवाणे असून महाराष्ट्राला यातून मला बाहेर काढायच आहे.