Kalyan: शाळेच्या बस अडकल्या वाहतूक कोंडीत, विद्यानिकेतनने पुन्हा दिली सुट्टी

Dombivali: डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेला बसतोय वाहन कोंडीचा फटका
Kalyan: शाळेच्या बस अडकल्या वाहतूक कोंडीत, विद्यानिकेतनने पुन्हा दिली सुट्टी
Updated on

Latest Dombivali News: कल्याण शीळ रोडवर मेट्रोचे काम सुरू असल्याने या मार्गावर सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहन कोंडी निर्माण होत आहे. या वाहन कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून शाळेच्या बस कोंडीत तासन तास अडकून पडत आहेत.

मुले शाळेत वेळेवर पोहचत नसल्याने शाळा प्रशासनाला शाळेला अनियोजित सुट्टी जाहीर करण्याची वेळ येत आहे. विद्यानिकेतन शाळेची बस कोंडीत अडकल्याने दुसऱ्यांदा शाळेला सुट्टी देत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण शीळ रोडवरील वाहन कोंडीची समस्या ही नित्याचीच झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे यात आणखी भर पडली आहे. कल्याण शीळ रोडवरील खड्डे चालकांना त्रासदायक ठरत असताना त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. चार लेनचे काम पूर्ण झाल्याने आता मुंबई, ठाणेला जाण्याचा मार्ग सुकर होईल असं वाटत असतानाच या ठिकाणी एमएमआरडीएकडून मेट्रोचे खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.

या कामामुळे नव्याने बनविण्यात आलेला सिमेंटचा रस्ता उखडण्यात आला आहे. तसेच कामाच्या ठिकाणी मोठ्या मशिनरी असल्याने पत्रे उभारण्यात आले आहेत. परिणामी मार्गावरील दोन्ही बाजूने केवळ सिंगल लेन सुरू आहे.

अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणेला जाणाऱ्या नागरिकांना केवळ हाच रस्ते मार्ग उपलब्ध आहे. शिवाय या भागात मोठं मोठी गृहसंकुल उभी रहात असल्याने यावर वाहनांची वर्दळ जास्त असते.

या कोंडीचा फटका केवळ चाकरमान्यांना नाही तर शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील बसत आहे. या मार्गावर अनेक मोठमोठ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आदि परिसरातून विद्यार्थी येत असतात. वाहन कोंडीमुळे शाळेच्या बस कोंडीत तासनतास अडकून पडतात. दररोज शाळेच्या बस सुमारे अर्धा ते पाऊण तास उशीरा शाळेत पोहोचत आहेत.

या वाहन कोंडीचा फटका कल्याण ग्रामीण मधील विद्यानिकेतन शाळेला बसत असून सलग दुसऱ्यांदा शाळेच्या बस कोंडीत अडकल्याने शाळेला सुट्टी जाहीर करण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे.

बुधवारी शाळेच्या या वाहन कोंडीत अडकल्याने दुपारच्या सत्रातील 9 व 10 वी ची बॅच व सिनिअर केजी शाळेला अनियोजित सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

शाळेचा संदेश

मानपाडा सर्कलजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे मानपाडा-उंबर्ली रोडवर जवळपास सर्व बस अजूनही अडकून पडल्या आहेत. त्यामुळे, सिनिअर केजी, 9 वी व 10 वीला आज (28-08-2024) अनियोजित सुट्टी असेल असा निर्णय घेण्यात आला आहे. एकदा का बसेस ओलांडल्या की ते त्यांच्या नियमित वेळेनुसार इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना उचलतील (आशा आहे). गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत...

सकाळी 8.50 पासून, सर्व बसेस, मेन रोड क्रॉस कधी करता येईल ह्या प्रतीक्षेत होत्या. त्या 10.30 नंतर रस्ता ओलांडू शकल्या. त्यामुळे 10.30 वाजता सुरू होणारे सिनिअर केजी, 9 वी व 10 वी वर्गाना सुट्टी जाहीर करावी लागली आहे. ह्या बसेस आता 5 वी ते 8 वी च्या मुलांना घेऊन येतील.

यापूर्वी देखील आली होती वेळ...

जून महिन्यात देखील 19 तारखेला शाळेच्या बस या कोंडीत अडकल्याने अर्धा पाऊण तास शाळेत उशिरा आल्या होत्या. या बस पुन्हा शहरात जाऊन दुपारच्या सत्रातील मुलांना कधी घेऊन येणार ती वेळ बसत नसल्याने अखेर शाळा प्रशासनाने दुपारच्या सत्रातील शाळेला सुट्टी दिली होती. तीच वेळ दोन महिन्यात पुन्हा शाळा प्रशासनावर आली आहे.

याविषयी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित म्हणाले, काही ठिकाणी सिंगल लेन सुरू असल्यामुळे वाहने कशीही आडवी तिडवी घुसतात, रस्त्याच्या दोन्ही बाजू ब्लॉक होतात, त्यामुळे या ठिकाणी वाहन कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. वाहतूक पोलीस येथे नसतात, मानपाडा चौकात सिग्नल बंद असल्याने चारी बाजूने वाहने येतात. डी मार्टकडून मानपाडा चौकात येण्यासाठी जो सिग्नल आहे, त्याचे ड्युरेशन फक्त 20 सेकंद आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घुसण्याची संख्या जास्त आहे. काही कंपनीच्या खाजगी बसेस या रस्त्यात कोठेही उभ्या करून त्यामध्ये कर्मचारी चढवत असतात त्यांना कोणाचाही धाक नाही. या बसेसमुळे अनेकदा वाहनांना अडथळा निर्माण होतो. रुणवाल गार्डन समोरील ओपनिंग बंद केल्यामुळे संदप, दिवा तसेच आतील हौसिंग सोसायटीतील वाहने चुकीच्या दिशेने येतात.

यावर उपाय म्हणून वाहतुकीच्या नियोजन करणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक येथे सकाळ संध्याकाळ करायला हवी सिग्नल दुरेशन वाढवण्यात यायला हवे रुणवाल गार्डन समोरील ओपनिंग सुरू करायला हवं चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ऑन द स्पॉट दंड आकारला गेला पाहिजेत. तरच यावर काहीशा प्रमाणात तोडगा निघू शकतो अशी माहिती पंडित सर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.