Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !

Latest Thane News: निविदा जाहीर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोंडी लवकरच फुटणार आहे.
Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !
Updated on

Kalyan City Latest News: शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत; मात्र आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या कामाची निविदा जाहीर केली आहे. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेगवान होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टिकोनातून विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मेट्रो, रस्ते, पूल, उड्डाणपूल, रस्ते रुंदीकरण, रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण, अशा अनेक प्रकल्पांतून वाहतूक गतिमान होणार आहे.

Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !
जलवाहिनी फुटल्याने कल्याणमधील नागरिकांचे हाल

कल्याण-उल्हासनगरसह अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ३६ मीटर आहे. गेल्या काही वर्षांत या उड्डाणपुलावरची वाहतूक वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार केला आहे; मात्र उड्डाणपूल दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची मागणी केली होती. या कामासाठी निधीही मंजूर करून दिला होता. कामकाजाची आवश्यक पूर्तता झाल्यानंतर आता एमएमआरडीएने या कामासाठी निविदा जाहीर केली आहे. वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपूल चार पदरी विकसित करणे गरजेचे आहे.

Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !
Kalyan: कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना दिड हजारांचे मोल कसे कळणार, विश्वनाथ भोईरांचा मविआवर हल्लाबोल

पुलावरची कोंडी फुटणार

मुंबई महानगर विकास प्राधिकरण ग्रामीण, तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व दळणवळण व्यवस्था मजबुतीसाठी विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत शहाड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाची एकूण लांबी १०९० मीटर इतकी आहे. निविदा जाहीर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे.

Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !
Pawan Kalyan Daughter: तिरुपती बालाजीचे दर्शन फक्त हिंदूंनाच घेता येते का? मंदिर प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून काय लिहून घेतले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.