Kalyan: मोठागावं फाटकातील खडी जीवघेणी; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक त्रस्त

Kalyan: मोठागावं फाटकातील खडी जीवघेणी;  रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक त्रस्त
Updated on

Latest Railway News: डोंबिवली पश्चिमेतील मोठागावं येथील रेल्वे फाटकातील रुळांच्या मार्गिकेत रेल्वे ठेकेदाराने मोठाली खडी आणून टाकली आहे. या मोठ्या खडीवरून प्रवास करताना वाहन चालकांचे चाक खडीत फसत आहे. यातून मार्ग काढताना कधी कधी दुचाकी चालकांचा तोल जात आहे. या खडी वरून प्रवास म्हणजे वाहन चालकांसाठी जीवघेणा प्रवास ठरत असून रेल्वे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेल्वे अपघात रोखण्यासाठी तसेच रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गावरील रेल्वे फाटक बंद केली आहेत. मात्र डोंबिवली पश्चिमेकडिल मोठागावं येथील रेल्वे फाटक अद्याप बंद करण्यात आलेले नाही. या ठिकाणचे रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. परिणामी वाहनचालक आज ही रेल्वे फाटक ओलांडून प्रवास करत आहेत.

Kalyan: मोठागावं फाटकातील खडी जीवघेणी;  रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाहनचालक त्रस्त
Kalyan Gramin: 'कल्याण ग्रामीण'मधून महायुतीचा उमेदवार रिंगणात कधी? शिंदे गटाची आळीमिळी गुपचिळी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.