Kalyan Vidhansabha: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, आ. विश्वनाथ भोईरांचा विरोधकांना टोला

Latest Kalyan News: विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली.
Kalyan Vidhansabha: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, आ. विश्वनाथ भोईरांचा विरोधकांना टोला
Updated on

Dombivali News: कल्याण पश्चिम मधून जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता काही ना काही बोलणार. माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचे दुकान कसे चालणार, चालणारच नाही. ते उमेदवार कोणी पण असू दे माझ्या पक्षातील असो किंवा बाहेरचे.

जोपर्यंत ते विश्वनाथ भोईर वर टीका करत नाही तोपर्यंत ते मोठे होणार नाहीत अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी इच्छुक विरोधी उमेदवारांना टोला हाणला आहे.

Kalyan Vidhansabha: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, आ. विश्वनाथ भोईरांचा विरोधकांना टोला
Kalyan Dombivli Water Supply : मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

कल्याण पश्चिम मतदार संघ शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा असून ते यंदाची निवडणूक लढण्यास देखील सज्ज आहेत. भोईर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील आमदार असल्याने त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येईल अशी एक चर्चा आहे.

तर शिंदे गटातून दुसरे देखील काही इच्छुक उमेदवार आहेत जे येथून उमेदवारी लढण्यास इच्छुक आहेत. तसेच शिंदे गटातून नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले साईनाथ तारे यांनी देखील ठाकरे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करत भोईर यांच्यावर विकास कामावरून टीका केली होती.

Kalyan Vidhansabha: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, आ. विश्वनाथ भोईरांचा विरोधकांना टोला
Kalyan: रिक्षाचालकाने हॉर्न वाजविला, पादचाऱ्याने डोक्यात दगडच घातला

मंगळवारी शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत घेत आपल्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले. यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली.

दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार भोईर यांनी आपल्याच पक्षातील इच्छुक तसेच विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांना टोला लगावत सांगितले की, जे इच्छुक आहेत त्यांना काही ना काही बोलावे लागणार. मी इथला सीटींग आमदार आहे. माझ्यावर बोल्याशिवाय त्याचें दुकान कसे चालणार, चालणारचं नाही ना.. कोणी असू दे माझ्या पक्षातील असो किंवा बाहेरील पक्षातील असो.

जोपर्यंत ते विश्वनाथ भोईरवर टीका करणार नाही ते मोठे होणार नाहीत. त्यांना आपण मोठे आहोत हे दाखवायचे असेल तर माझ्यावर बोलणेच आहे अशा खोचक शब्दांत भोईर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. दरम्यान भोईर यांना येत्या निवडणुकीत ठाकरे गट आणि स्वतःच्या पक्षातील इच्छुक उमेदवारांचे आव्हान आहे.

Kalyan Vidhansabha: माझ्यावर बोलल्याशिवाय त्याचे दुकान कसे चालणार, आ. विश्वनाथ भोईरांचा विरोधकांना टोला
Kalyan Traffic: वाहतूक कोंडीतून होणार कल्याणकरांची सुटका, या उड्डाणपूलचे होणार चौपदरीकरण !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.