Kalyan: प्राण्याचे रुग्णालय नाही म्हणून मनपाच्या मुख्यालयातच आणली आजारी बकरी!

KDMC: नागरिकांनी दाद नेमकी कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होत आहे.
Kalyan प्राण्याचे रुग्णालय नाही म्हणून मनपाच्या मुख्यालयातच आणली आजारी बकरी!
Kalyan:sakal
Updated on

Dombivali : कल्याण बैलबजार परिसरात प्राण्याचे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय कुठे स्थलांतरित करण्यात आले आहे. खरेच रुग्णालय आहे का ? याची माहिती कोणाकडेच मिळत नसल्याने. तसेच रुग्णालयाच्या नावाने असलेला दूरध्वनी क्रमांक देखील वारंवार बंद लागत असल्याने संतप्त झालेल्या मनोज वाघमारे यांनी आपली आजारी बकरी घेऊन थेट केडीएमसीचे मुख्यालय गाठले.

संतप्त नागरिकाच्या या प्रकारामुळे पालिकेचे सुरक्षारक्षक ही गोंधळून गेले. पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून नागरिकांनी दाद नेमकी कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होत आहे.

Kalyan प्राण्याचे रुग्णालय नाही म्हणून मनपाच्या मुख्यालयातच आणली आजारी बकरी!
Kalyan Railway: कल्याण स्टेशन परिसराची परिस्थिती सुधाणार? खासदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी

कल्याण पूर्वे परिसरात राहणारे नागरिक मनोज वाघमारे यांच्या बकरीचे पोट अचानक फुगू लागल्याने बकरी अस्वस्थ झाली होती. या बकरीचा इलाज करण्यासाठी वाघमारे यांनी हॉस्पिटल बाबत माहिती काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षक विभागाकडे फोन लावला. मात्र या फोनला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी पालिका उपायुक्तांना फोन लावला. त्यांच्याकडूनही अपेक्षित माहिती मिळाली नाही. अखेर संतापलेल्या वाघमारे यांनी आपल्या बकरीला घेऊन थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. त्यामुळे काही काळ पालिका आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

Kalyan प्राण्याचे रुग्णालय नाही म्हणून मनपाच्या मुख्यालयातच आणली आजारी बकरी!
Kalyan Metro: कल्याण शिळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा, मनसेच्या आमदाराने विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष

पालिका प्रशासन फोनचा बिल भरत नाही का त्याचप्रमाणे नेमकं प्राण्यांचा इलाज कुठे करायचा याची माहितीच मिळत नसेल तर करदात्या नागरिकांनी काय करायचं असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला. सुरुवातीला जनावरांचा दवाखाना बैल बाजार परिसरात होता मग तो दवाखाना गेला कुठे? रामभरोसे आहे का? असा सवाल त्यांनी व्यक्त करत पालिका प्रशासनावर थेट निशाणा साधला. एकीकडे शहरात स्मार्ट सिटी चा गाजावाजा सुरू असताना माणसांना देखील इलाजासाठी दुसरीकडे जावं लागतं तर तिथे जनावरांचं काय? अशी खंत कल्याण डोंबिवलीकरां कडून व्यक्त होताना दिसतेय.

केडीएमसीचे श्वानांसाठी जो दवाखाना आहे त्याच ठिकाणी प्राण्यांचा दवाखाना देखील आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र स्वतंत्र असे वेगळे रुग्णालय नाही असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Kalyan प्राण्याचे रुग्णालय नाही म्हणून मनपाच्या मुख्यालयातच आणली आजारी बकरी!
Kalyan: आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.