Kalyan News : कल्याणमध्ये बारावे जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली; हजारो लीटर पाणी वाया

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राला येणारी जलवाहिनी रात्री अचानक शहाड येथे मोठ्या प्रमाणात लिकेज झाली.
Kalyan Water Pipe Barave Water
Kalyan Water Pipe Barave Wateresakal
Updated on
Summary

उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची (Kalyan Dombivli Municipal Corporation) बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी मंगळवारी रात्री शहाड येथे फुटली. वाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया जाऊन आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. याचा फटका कल्याण पूर्व व पश्चिम भागाला बसून सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. अचानक पाणी न आल्याने नागरिकांचे हाल झाले. 10 वाजेपर्यंत पालिकेने वाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण करत पाणी पुरवठा पूर्ववत केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राला येणारी जलवाहिनी रात्री अचानक शहाड येथे मोठ्या प्रमाणात लिकेज झाली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. याची माहिती मिळताच पालिकेच्या पाणी पुरवठा सकाळी 6 वाजता पाणीपुरवठा (Water Supply) बंद करत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले.

Kalyan Water Pipe Barave Water
Arjuna-Kodavali River : गाळ उपसा सोडवणार राजापूरच्या पुराचा वेढा; अर्जुना नदीपात्राची खोली आणि रुंदीही वाढली

मध्यरात्री जलवाहिनी फुटल्याने काळोखात दुरुस्तीचे काम करणे अवघड होते. तसेच जलवाहिनीतील पाण्याच्या प्रवाहाला उच्चतम वेग असल्याने हे पाणी तात्काळ थांबविणे अशक्य होते. जोपर्यंत जलवाहिनीतील पाणी खाली होत नाही, तोपर्यंत पालिका पाणी पुरवठा अधिकारी, ठेकेदार यांना दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. त्यामुळे या कामास थोडा विलंब झाल्याचे सांगण्यात आले.

Kalyan Water Pipe Barave Water
'या' सर्वात जुन्या धरणासाठी म्हैसूरच्या महाराजांनी राजेशाही दागिने ठेवले होते 'गहाण'; काय आहे धरणाची खासियत?

उल्हास नदीतून शहाड येथे पाणी उचलून ते बारावे येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. जल वाहिनीतील अतिउच्चत दाबामुळे किंवा व्हाॅल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड झाला की अशा घटना घडतात, असे अधिकारी यांनी सांगितले. जलवाहिनीतील पाण्याची पातळी सकाळी कमी झाल्यानंतर पालिका अधिकारी, ठेकेदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. कल्याण शहराला पाणी टंचाईची झळ बसणार नाही यादृष्टीने तात्काळ जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू केला. सकाळच्या वेळेत कल्याण शहराला पाणी पुरवठा झाला नसला तरी आता दुपार आणि संध्याकाळी नियमित पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.